Dont let Dindya come to Pandharpur for Karthiki Wari 
सोलापूर

यंदा कार्तिकीसाठीही दिंड्या पंढरपूरकडे येऊ शकणार नाहीत

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : यंदा कार्तिकी यात्रेसाठी राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यातून पंढरपूर येथे दिंड्या दाखल होऊ देऊ नयेत, असे आदेश विधी व न्याय विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे यंदा कार्तिकीसाठी कोणतीही दिंडी पंढरपूरकडे येऊ शकणार नाहीत.

कार्तिकी एकादशी 26 नोव्हेंबरला आहे. त्याआधीपासून राज्याच्या विविध भागातून पायी दिंड्या पंढरपूरकडे येण्यास निघत असतात. आषाढी यात्रा यंदा होऊ शकली नाही आणि सुमारे आठ महिने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे कार्तिकी यात्रेसाठी यंदा नेहमीपेक्षा जास्ती संख्येने वारकरी भाविक येण्याची शक्यता आहे. कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने गर्दी झाल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता येणार नाही. श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेत दोन व्यक्तींमध्ये सहा फूटांचे अंतर ठवायचे झाल्यास दर्शन रांग 25 किलोमीटरहून अधिक लांब जाईल. पोलिस, आरोग्य आणि अन्य यंत्रणेवर कमालीचा ताण येईल. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांनी शासनाकडे यंदाची वारी प्रतिकात्मक असावी, असा प्रस्ताव पाठवला होता. त्याची दखल शासनाने घेतली आहे.

कार्तिकी यात्रेच्या निमित्त महाराष्ट्रातील जिल्ह्यातून यावर्षीही दिंड्या पंढरपूर येथे दाखल होण्याची शक्यता आहे, कार्तिकी एकादशी निमित्त देवस्थानात करावयाचे नित्योपचार समित मान्यवरांच्या उपस्थितीत व कोरोना विषाणूचा प्रार्दभाव रोखण्याच्या दृष्टीने सामाजिक राखून व कोरोना संर्दभात सर्व मागर्दर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन होणार अाहे. कोरोना विषाणूचा प्रार्दभाव रोखण्यासाठी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार नाहीत याची खबरदारी घेण्याचा लेखी अादेश विधी व न्याय विभागाने काढला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT