मंगळवेढा - सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ आठवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारमधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्यामुळे दुष्काळ हटविला गेल्याची प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथे बोलताना व्यक्त केले.
विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. समाधान आवताडे, आ. सुभाष देशमुख, आ. राजेंद्र राऊत, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. राम सातपुते, मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, शहाजी पवार, चेतनसिंह केदार, आदिसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, युती सरकारने पाण्यासाठी अनेक योजना राबवल्या मात्र त्या योजना त्यानंतर 15 वर्षे बंद पडल्या, मी मुख्यमंत्री होताच केंद्राच्या मदतीतून पश्चिम महाराष्ट्रातील बंद पडलेल्या योजनाना सुरू करून सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्याला दुष्काळ हटवला गावे पाणीदार केली.
जलयुक्त शिवार मधून जलसंधारणाची कामे केली.शेतकय्राच्या हिताचे विचार करणारे सरकार असल्याने शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्यासाठी शेतीसाठी स्वतंत्र वीज वितरण कंपनी निर्माण केली, सौर प्रकल्पातून 12 हजार मेगावॅट वीजनिर्मिती केलेत्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळणार आहे. शेतकऱ्याचे वीज बिल देखील माफ केले.
मागेल त्याला सौर पंप देण्याचे काम महायुती सरकारने केले. शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी एक रुपयात पिक विमा योजना आणली त्यातून 8000 कोटीची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली. मुलीचा जन्मदर वाढण्यासाठी लेक लाडकी योजना योजना राबविली.
तर मुलीच्या शिक्षणासाठी देखील शासनाने थेट त्यांच्या खात्यावर अनुदान देण्याचे काम केले.महिलांसाठी मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मदत देण्याची भूमिका सरकारने पाणी पाडली. उलट ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील आगाऊ स्वरूपात खात्यावर जमा करून दिले आहेत. यावेळी आ. समाधान आवताडे यांची मनोगत झाले. सूत्रसंचालन भारत मुळे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.