Onion 
सोलापूर

Solapur Market Onion Rate: सोलापूरच्या मार्केटमध्ये कांदा 5 हजारावर; केंद्राच्या निर्णयामुळे नाही तर 'या' कारणामुळे दर वाढले

onion has reached 5 thousand rupees: 11सप्टेंबरला कांद्याचे दर 4700 रुपये इतके होते. आज कांद्याचे दर 5 हजार रुपये पर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे दहा दिवसामध्ये कांद्याचे दर 300 रुपयांनी वाढले आहेत.

कार्तिक पुजारी

Solapur Onion: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर 5 हजारापर्यंत पोहोचल्याचा पाहायला मिळत आहे. 11सप्टेंबरला कांद्याचे दर 4700 रुपये इतके होते.आज कांद्याचे दर 5 हजार रुपये पर्यंत पोहोचले आहेत. याचा अर्थ दहा दिवसामध्ये कांद्याचे दर 300 रुपयांनी वाढले आहेत. नवीन कांद्याची आवक वाढल्यास कांद्याचे दर स्थिर राहणार आहेत.

कर्नाटकातील इंडी, विजयपूर त्यासोबतच तेलंगणा मधून सोलापुरात कांद्याची आवक झाली आहे.शिवाय कलबुर्गी, आळंद,अफलपूर या कर्नाटकातील तालुक्यातून पांढऱ्या कांद्याची आवक वाढली आहे.विशेष म्हणजे यंदा दिवाळीपूर्वीच नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे.दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर नवीन कांदा मार्केटमध्ये येतो. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची आवक लवकर सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक हळूहळू सुरू होत असल्यामुळे दोन दिवसातच कांद्याचे दर नियंत्रणात आले आहे. केंद्र सरकाराने निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे दर वाढले नाही तर कांद्याची आवक कमी असल्यामुळे कांद्याचे दर वाढत आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नवीन कांद्याचे दर 45 रुपये प्रतिकिलो तर जुना कांद्याचे दर 50 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT