सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना (Covid-19) बाधित व्यक्तींच्या मृत्यूचे सत्र काही केल्या थांबता थांबत नाही. ग्रामीण भागातील 45 व महापालिका हद्दीतील 9 अशा एकूण 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून (Corona Report) स्पष्ट झाले आहे. मे महिन्याच्या सुरवातीपासूनच सोलापूर शहर व जिल्ह्यात दररोज सरासरी पन्नास व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. वाढत्या मृत्यू संख्येने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. (Due to Corona 54 people died in Solapur city and district on Saturday)
सोलापूर महापालिका हद्दीत 125 ग्रामीण भागात 1889 अशा एकूण 2014 नव्या कोरोना बाधितांची भर आज पडली आहे. आज एकाच दिवशी 1747 कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यातील 1593 जण ग्रामीण भागातील तर 154 जण महापालिका हद्दीतील आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ऍक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 19 हजार 565 झाली आहे. त्यातील 17 हजार 830 जण हे ग्रामीण भागातील तर 1735 जण हे महापालिका हद्दीतील आहेत.
माढ्यात 9 जणांचा मृत्यू
आजच्या ग्रामीण भागाच्या अहवालात कोरोनामुळे 45 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक नऊ मृत्यू माढा तालुक्यात झाले असून दक्षिण सोलापूर व मंगळवेढा तालुक्यात प्रत्येकी आठ, मोहोळ तालुक्यात सहा, पंढरपूर तालुक्यातील तीन, माळशिरस तालुक्यात पाच, बार्शी तालुक्यातील सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पंढरपूरमध्ये एकाच दिवशी 478 बाधित
ग्रामीण भागात आज 1889 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यात सर्वाधिक 478 रुग्ण पंढरपूर तालुक्यातील आहेत. अक्कलकोट तालुक्यातील 39, बार्शी तालुक्यातील 187, करमाळा तालुक्यातील 155, माढा तालुक्यातील 314, माळशिरस तालुक्यातील 250, मंगळवेढा तालुक्यातील 195, मोहोळ तालुक्यातील 104, उत्तर सोलापूर तालुक्यातील 26, सांगोला तालुक्यातील 58 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 83 नव्या कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.