Sakal
सोलापूर

आता 'माझा विद्यार्थी माझी जबाबदारी'

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या (Corona) पहिल्या व दुसऱ्या लाटेत माझे कुटुंब माझी जबाबदारी, त्यानंतर मीच जबाबदार, माझे गाव कोरोनामुक्‍त गाव अशा मोहिमांच्या माध्यमातून विषाणूचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. याच धर्तीवर आता तिसऱ्या लाटेच्या शक्‍यतेने शालेय शिक्षण (school education) विभागाने 'विद्यार्थी माझी जबाबदारी' (Students my responsibility) या मोहिमेची तयारी केली आहे. (due to the growing corona, the department of school education has prepared the student my responsibility campaign)

राज्यातील एक लाख नऊ हजार अंगणवाड्या, 70 हजार 812 पहिली ते आठवीच्या शाळा आणि नववी ते बारावीच्या 22 हजार 204 शाळांमधील मुख्याध्यापकांच्या माध्यमातून शिक्षकांच्या मदतीने ही मोहीम यशस्वी केली जाणार आहे. हे शैक्षणिक वर्ष 14 जूनपासून ऑनलाइन पध्दतीने सुरू झाल्यानंतर प्रत्येक मुलाला आणि त्याच्या पालकांना प्रबोधनाचे धडे दिले जाणार आहेत. कोणती लक्षणे असल्यानंतर काय खरबदारी घ्यावी, पालकांनी मुलांचे आरोग्य कसे जपावे, याची माहिती शिक्षकांकडून दिली जाणार आहे.

मुख्याध्यापकांकडून दर आठवड्याला त्यासंबंधीचा अहवाल शिक्षणाधिकारी जमा करतील. संशयित तथा ऑनलाइन तासिकेला अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून त्याच्या तब्येतीची खबर घेतली जाणार आहे. कोरोना होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी आणि झालाच तर तातडीने काय करावे, याचेही धडे ऑनलाइन पध्दतीने दिले जाणार आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी विद्यार्थी व पालकांचे प्रबोधन करून ही लाट येण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण आणण्याच्या हेतूने माझा विद्यार्थी माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांची मदत घेतली जाणार असून मुलांना कोरोनाचे संक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे.

- औदुंबर उकीरडे, शिक्षण उपसंचालक, पुणे

राज्यातील विद्यार्थी संख्या

- 0 ते 6 वयोगट- 75,27,282

- 7 ते 14 वयोगट- 1,46,86,493

- 15 ते 18 वयोगट- 56,48,028

- एकूण- 2,78,61,803

फी न दिल्याने मुलांचे शिक्षण बंद

कोरोनाच्या संकटामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली आहे. अशा अडचणींमुळे खासगी विनाअनुदानित शाळांनी कोणतीही फी वाढ करू नये, अशी मागणी पालक व पालक संघटनांनी केली आहे. तरीही, फी न भरल्याने काही शाळांनी मुलांचे शिक्षण बंद केल्याच्या 18 तक्रारी शिक्षण उपसंचालकांकडे आल्या आहेत. पुण्यातील सर्वाधिक तक्रारी असून काही तक्रारी नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूरमधील आहेत. त्याअनुषंगाने आता शिक्षण उपसंचालकांनी शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, विनाअनुदानित सर्व मंडळे व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांनी खुल्या, मागास प्रवर्ग, ओबीसी विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या सर्व शुल्काची माहिती मागवली आहे. तसेच पालक-शिक्षक संघाच्या बैठकीचा अहवाल व कार्यकारी समितीकडे दिलेल्या शुल्क निर्धारणाचा प्रस्ताव मागितला आहे. (due to the growing corona, the department of school education has prepared the student my responsibility campaign)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT