Maratha Morcha Esakal
सोलापूर

मराठा आक्रोश मोर्चा! शहर-जिल्ह्यात संचारबंदी, एसटी बसच्या मार्गात बदल

मराठा आक्रोश मोर्चा! शहर-जिल्ह्यात संचारबंदी, एसटी बसच्या मार्गात बदल

विजय थोरात

मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या मार्गात बदल केल्याची माहिती दिली.

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) येत्या 4 जुलै रोजी सोलापूर शहर - जिल्ह्यात छत्रपती संभाजी महाराज चौक येथून मराठा आक्रोश मोर्चा (Maratha Akrosh Morcha) निघणार आहे. मराठा आक्रोश मोर्चास संभाजी महाराज चौक येथून सुरवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने (State Transport Corporation) एसटीच्या फेऱ्यांच्या मार्गात बदल केल्याची माहिती दिली. (Due to the Maratha Morcha in Solapur, the route of ST bus has been changed)

सोलापूर बस स्थानकातून बाहेर जाणाऱ्या बस या मुख्य गेटने न जाता सर्व बस पाठीमागील गेटने म्हणजेच जीएम चौक, सम्राट चौक, जुना कारंबा नाका मार्गे जाणार व येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अक्कलकोटकडे जाणारी व येणारी वाहतूक ही सोलापूर बस स्थानकामधील पाठीमागील गेटने जीएम चौक, सम्राट चौक, जुना कारंबा नाका ते मार्केट यार्ड, बोरामणी नाका, शांती चौक, अक्कलकोट नाका तसेच अक्कलकोटहून येणारी वाहनेही याच मार्गाने सोलापूर बस स्थानकात येणार आहेत.

मंगळवेढा विभागाकडून येणारी व जाणारी वाहतूक याप्रमाणे : सोलापूर बस स्थानकामधील पाठीमागील गेट म्हणजे जीएम चौक, सम्राट चौक, जुना कारंबा नाका ते मार्केट यार्ड, बोरामणी नका, शांती चौक, व्हीवको प्रोसेस, पोलिस मुख्यालय समोरून, रंगभवन चौक, डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, भय्या चौक, देगाव टोल नाका याप्रमाणे मंगळवेढा विभागाकडून येणारी व जाणारी वाहतूक होणार आहे.

पुणे व तुळजापूर या मार्गावरून येणारी व जाणारी वाहतूक याप्रमाणे : सर्व वाहने सोलापूर बस स्थानकाच्या पाठीमागील गेटमधून होणार आहे. यामध्ये बस जीएम चौक, सम्राट चौक, जुना कारंबा नाका मार्गे जातील व येणारी वाहने ही याच मार्गाने सोलापूर बस स्थानकात येणार आहेत.

विजयपूर रोड व कर्नाटक या भागातून येणाऱ्या- जाणाऱ्या बसचा मार्ग सोलापूर बस स्थानकाच्या पाठीमागील गेट म्हणजेच जीएम चौक, सम्राट चौक, जुना कारंबा नाका ते मार्केट यार्ड, बोरामणी नाका, शांती चौक, आम्रपाली चौक, महावीर चौक, पत्रकार भवन, विजयपूर रोड याच मार्गाने जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांचा मार्ग असणार आहे.

आगारातून बाहेर पडणाऱ्या सर्व बस या जीएम चौकापासून सम्राट चौक मार्गे मार्गस्थ होणार आहेत. बाहेरील सर्व बस या आगारात येताना याच कारंबा नाका, सम्राट चौक, जीएम चौक मार्गे बस स्थानकात येणार आहेत. तसेच जीएम चौक येथे दोन कर्मचारी नियमनासाठी असणार आहेत व सम्राट चौक येथे एक कर्मचारी तसेच इतरत्र आवश्‍यक ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही वाहतूक सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू असणार असल्याचे देखील एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शहर-जिल्ह्यात संचारबंदी

या पार्श्‍वभूमीवर शहर व जिल्हा परिसरात संचारबंदी तर शहरात जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारीत केले आहेत. तर जिल्ह्यातील तालुक्‍यातून येणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. जीएम चौक, सम्राट चौक, कारंबा नाका, मार्केट यार्ड, रंगभवन या मार्केट सोलापूर बस स्थानकात एसटी बस येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगितले आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आक्रोश मोर्चा आणि सकल मराठा मोर्चाच्या वतीने सरकारविरोधात मराठा मोर्चा निघणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

Shreyas Talpade : "मी अक्षयचा आयुष्यभर ऋणी " ; हार्टअटॅकनंतर अक्षयकुमारने श्रेयसला अशी केली मदत

SCROLL FOR NEXT