सोलापूर

बेलाटीला मिळाले दुष्काळापासून स्वातंत्र्य! श्रमदानाचा झाला फायदा

अरविंद मोटे

सोलापूर: पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेले बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) हे गाव आज दुष्काळमुक्त झाले आहे. गावाने श्रमदानातून राबविलेल्या विविध उपक्रमामुळे बेलाटी गावाला दुष्काळापासून कायमचे स्वातंत्र्य मिळाले आहे.

अवघ्या तीन हजार लोकसंख्येचे बेलाटी (ता. उ.सोलापूर) हे गाव पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत राज्यात प्रथम आल्यामुळे सर्वत्र गाजले आहे. या गावाने अवघ्या 45 दिवसांत श्रमदानातून ही किमया केली आहे. मात्र, त्यापूर्वीच्या काही वर्षांची मेहनतही त्या पाठीमागे आहे. या गावचे तत्कालीन सरपंच सुनील काटकर यांनी गावकऱ्यांबरोबर घेऊन सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने हा बदल घडवला आहे. सोलापूरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर माळरानावर वसलेले हे गाव एकेकाळी ओसाड होते. पाण्याचे दुर्भिक्ष्य पाचवीला पूजलेले होते. या गावाने श्रमदानातून व विविध सरकारी योजनांमधून 12 किलोमीटरचे नाला सरळीकरण केले.

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावच्या शिवारातील पाणी शिवारातच मुरले पाहिजे हे तत्व पाळले. अगदी गावचे सांडपाणी घरोघरी शोषखड्डे करून गावातच मुरवले. वेळोवेळी वृक्षारोपण करून 2600 झाडांचे संगोपण केले. 2018 पासून वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या माध्यमातून गावाच्या कायापालटाचा ध्यास घेतला व गावकऱ्यांनी सलग 45 दिवस श्रमदान करून पाणी फाउंडेशनचा वॉटरकप मिळवला. यासाठी नियमित चारशे ते पाचशे गावकरी श्रमदान करत होते. जलयुक्त शिवार योजनेतून विविध ठिकाणी "पाणी आडवा पाणी जिरवा मोहिम' राबवली. केतन शहा यांच्या माध्यमातून जैन संघटनेच्या वतीने जेसीबी मशीनची मदत मिळाली. अनेक पदाधिकारी, शासकीय अधिकारी कृषी खाते यांनी डिझेलची व्यवस्था केली. यामुळे गाव सुजलाम सुफलाम बनले. ज्या गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते, त्या गावात आज ऊस, द्राक्ष, डाळिंब तसेच भाजीपाला पिकवला जात आहे. गावाला दुष्काळापासून स्वातंत्र्य मिळाले आहे.

ठळक बाबी

- पाणी फाउंडेशच्या स्पर्धेत राज्यात प्रथम

- सर्व गाव हागणदारीमुक्त, केरोसीनमुक्त

- ग्रामस्वच्छता योजनेचा प्रथम पुरस्कार

- ओढे नाले यावर 21 बंधारे, 3 पाझर तलाव

- गावात स्मार्ट स्कूल, पंधरा वर्ग खोल्या, प्रत्येकाला पक्के घर

तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, राजेंद्र भारुड, अरुण डोंगरे यांच्यासह प्रवीणसिंह परेदशी यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले. गावकऱ्यांनीही सहकार्य केले. यामुळे हा बदल घडू शकला. सातत्याने प्रयत्न केला तर अल्पावधीत हा बदल प्रत्येक गावात घडवता येऊ शकतो.

- सुनील काटकर, माजी सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT