E-Peek Server Down esakal
सोलापूर

E-Peek Server Down : ई-पीक नोंदीचा सर्व्हर डाऊन; शेतकऱ्यांचं होणार मोठं नुकसान, प्रशासन करतंय तरी काय?

सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पळापळ होताना दिसत आहे.

हुकूम मुलाणी ​

खरीप पीक व पीक विम्याची भरपाई मिळवण्यासाठी सातबारावर ई-पीकव्दारे नोंदणी आवश्यक असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले.

मंगळवेढा : खरीप पीक (Kharif crop) नुकसानीची भरपाई निश्चित करताना सातबारावर ई-पीक (E-Peek) नोंदीचा सर्व्हर डाऊन असल्यामुळं शेतकऱ्यांची पळापळ होत आहे. निसर्गानं पाऊस लांबवून शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवली असतानाच आता सर्व्हर डाऊन झाल्याने आणखीनच चिंतेत भर पडली.

खरीप हंगामात वेळेवर पाऊस होईल यादृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पूर्व मशागत करून पेरणी केली. शासनाने यंदा पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम शासनाने भरल्यामुळे तालुक्यातील 68078 हजार शेतकऱ्यांनी 51272.83 हजार हेक्टरवर बाजरी, तूर, मका, कांदा आदी पिकांचा विमा भरला. मात्र, सूर्यफूल, भुईमूग या पिकांना विम्याचं संरक्षण नाही.

पावसाने ओढ दिल्यामुळे या सर्व पिकांनी माना टाकल्या. शासन स्तरावर सध्या चारा डेपो किंवा छावण्या सुरू होण्याचा निर्णय होत नाहीये. समाधान आवताडे यांनी पावसाळी अधिवेशनात चारा छावण्याची सुरुवात तातडीने करावी, अशी मागणी करून देखील प्रशासनाने जिल्ह्यात दोन महिने पुरेल इतका चारा शिल्लक असल्याचा दावा केल्यामुळे प्रशासनाच्या या कागदोपत्री अहवालाबद्दल शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

अशा परिस्थितीत तालुक्यातील नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी ई पीक नोंदीचा पर्याय दिला. सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई-पीक नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी पळापळ होताना दिसत आहे. त्यामुळे या पिकांची नोंद होणार का नाही याबाबत शेतकरी चिंतेत सापडले.

परंतु, प्रशासनाकडून याबाबत ठोस मार्गदर्शन केले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन भर पडले आहे. जिल्ह्यात 71 मंडलच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असताना तालुक्यातील 3 मंडलचा यात समावेश आहे. उर्वरित पाच मंडलमध्ये देखील पिकांची परिस्थिती अतिशय वाईट आहे.

खरीप पीक व पीक विम्याची भरपाई मिळवण्यासाठी सातबारावर ई-पीकव्दारे नोंदणी आवश्यक असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले. परंतु, गेली दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे पिकांची नोंदणी करता येऊ शकली नाही. यासाठी मुदतवाढ देण्याची गरज आहे.

-सुनिल निकम, शेतकरी चिक्कलगी

सर्व्हर डाऊन झाल्यामुळे शेतकरी ई-पीक नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून मुदतवाढ देण्यासंदर्भात वरिष्ठांशी पत्रव्यवहार करणार आहे.

-मदन जाधव, तहसीलदार मंगळवेढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT