The Election Commission has imposed restrictions on 144 candidates from 16 gram panchayats in Mangalwedha taluka 
सोलापूर

निवडणूक आयोगाचा दणका ! 16 ग्रामपंचायतीच्या 144 उमेदवारांवर घातले निवडणूक लढविण्यावर निर्बंध

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यात 2015 ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च निवडणूक आयोगास सादर न केल्यामुळे तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीमधील 144 उमेदवारांना निवडणूक लढविण्यावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक जास्त संख्या सुशिक्षिताचे गाव असलेल्या मरवडे (22) गावातील आहे, तर सर्वात कमी गुंजेगाव (1) इतकी आहे.
 
तालुक्यात सन 2015 साली ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या निवडणूक खर्चाचा हिशोब निवडणूक कार्यालयात वेळेत सादर करणे उमेदवारास आवश्यक होते. परंतु तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी आपल्या निवडणुकीचा खर्च निवडणूक आयोगास वेळेत सादर केलेला नाही. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक खर्च सादर न केलेल्या उमेदवारांची यादी सादर केली. त्यावर निवडणूक आयोगाने कारवाईचा निर्णय घेत त्या उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढविण्यावर बंदी घातली. त्यात तालुक्यांमध्ये 16 ग्रामपंचायतीमधील 144 उमेदवारांचा यात समावेश आहे. १६ मधील १५ ग्रामपंचायतीची निवडणुकाची रणधुमाळी सध्या तालुक्यांमध्ये सुरू आहे.

सरपंच पदाचे आरक्षण पुढे ढकलल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील उत्साह कमी झाला असला तरी आगामी काळातील पोटनिवडणूक तालुक्यातील मोठ्या सहकारी संस्थेची निवडणूक पाहता ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व असावे. या दृष्टीने राजकीय मोर्चेबांधणी वेगात सुरू असतानाच निवडणूक आयोगाच्या आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अपात्र उमेदरवाराच्या यादीमुळे गावगाड्यातील नेतेमंडळींना या यादीतून वगळून नवीन उमेदवार शोधण्यासाठी आणखीनच गोची झाली. त्यामुळे अपात्र केलेल्या 144 पैकी 143 उमेदवारांना सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या या कारवाई भूमिकेच्या कारवाईमुळे निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराने आपल्या खर्चाचे विवरण तात्काळ देणे बंधनकारक आहे.

गावनिहाय अपात्र संख्या पुढीलप्रमाणे

लवंगी 20, बोराळे 3, घरनिकी 2, भोसे 10, सलगर बुद्रुक 21, तांडोर 7, गुंजेगाव 1, लमाण तांडा 14, कचरेवाडी 3, लेंडवेचिंचाळे 13, माचनूर 9, गणेशवाडी 8, आसबेवाडी 7, नंदेश्वर 4, मरवडे 22, सिद्धापूर 2 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT