सोलापूर

जिल्हाभर वेळ आमावस्येचा उत्साह! मित्रपरिवारासह कुटुंबीयांनी घेतला आनंद

सकाळ वृत्तसेवा

बार्शी (सोलापूर) : वेळ अमावस्या म्हटलं की शेतकऱ्यांसाठी काळ्या आईच्या पूजेचा सण. या सणाला ग्रामीण भागात मोलाचे स्थान आहे. वेळ अमावस्या म्हटलं की लहान मुलं, महिला, पुरुष सर्वासाठी एकत्र येऊन शेतशिवारात जाऊन आनंदात पांडवांची पूजा करून साजरा करण्याचा दिवस असतो. आज जिल्ह्याच्या विविध भागामध्ये हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

मूळ कर्नाटकातील असणारा सण महाराष्ट्रातील उस्मानाबाद, सोलापूर, लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्‍यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या दिवशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. यादिवशी सकाळी लवकरच अनेक कुटुंबे आपल्या परिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची (पंचमहाभूते) पूजा करतात तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते.

ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली भज्जी, खीर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजन केले जाते. या सणानिमित्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही, अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. इतर सणांमध्ये आढळणारी निसर्गाची हानी या सणांत नाही. याउलट माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण आहे.

रातंजन (ता. बार्शी) येथील बापू दत्तू नागटिळक यांच्या शेतामध्ये वेळ आमावस्याची पूजा करण्यात आली होती. अतिशय आनंदमय वातावरणात शेतामध्ये मित्रपरिवास बोलावून उत्साहात सण साजरा करण्यात आला. शेतामध्ये गौतम नागटिळक, बिरु नागटिळक, माधुरी नागटिळक, सीता डोळस, दिपाली चौधरी, दुर्गा नागटिळक, माया सुरवसे, गीता बनसोडे, कृष्णा बनसोडे, भैरवनाथ चौधरी, ममता वाघमारे, सोनू वाघमारे, साहिल डोळसे, श्रीहरी हजारे आदी उपस्थित होते. गत दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असल्याने शेतशिवार हिरवागार झाल्याचे दिसून येत आहे.

निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक

रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ लागलेला हरभरा, हवेच्या तालावर नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी, असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग. अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पूजा म्हणजे शेतकरी व निसर्गाचे शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शविते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test Series : ऋतुराज गायकवाड पर्थ कसोटीत सलामीला खेळणार? भारत अ संघाच्या २ फलंदाजांना BCCI थांबवणार

स्टार प्रवाहने केली आणखी एका नव्या मालिकेची घोषणा ; 'या' गाजलेल्या हिंदी मालिकेचा आहे रिमेक

गोफण | बॅगा तपासल्या अन् पैसे हरवले

Latest Maharashtra News Updates live : अमित शाहांचे आजचे सभा दौरे रद्द

Beed Crime News : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पांढरवाडी फाटा येथे ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT