Ajit Pawar And Devendra Fadnavis  sakal
सोलापूर

Ladki Bahini Scheme : कोणतीही योजना बंद पडणार नाही फडणवीसांसह पवार यांचे आवाहन; मुख्यमंत्री लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळा

Ladki Bahini Scheme : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सोलापूर येथे आयोजित लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्यात सर्व योजना सुरू राहणार असल्याची ग्वाही दिली.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : काँग्रेसला अनेक वर्षे संधी मिळाली. मात्र, त्यांनी महिला सक्षमीकरणासह जनहिताकडे दुर्लक्ष केले. सावत्र भावांनी चुनावी जुमला म्हणत जनहिताच्या योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

लाडकी बहीणसह सर्व योजना पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गाने महायुतीची वाटचाल सुरू असून आम्ही फसवणूक करणार नाही, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी बहिणींच्या पाठबळावर पुन्हा राज्यात महायुतीच सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

निवडणुकीत विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले. मंगळवारी (ता. ८) सोलापुरात आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी उपसा सिंचन योजनांसह जलसिंचन सौर ऊर्जा, लाडकी बहीण योजनेच्या चित्रफीतीचे रिमोटद्वारे उ‌द्घाटन व अनावरण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडक्या बहिणीसह समाजाच्या सर्व वर्गाचे बळ आमच्या पाठीशी आहे. सावत्र भावांना आणि लाच म्हणून हिणवणाऱ्या सोलापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्यात मंगळवारी (ता. ८) उपसा सिंचन योजना, जलसिंचन सौर ऊर्जीकरण योजनेचे रिमोटद्वारे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार. ex महिला नेत्यांना बहिणीचे दुःख समजणार नाही.

महिलांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणण्यास महायुती सरकार वचनबद्ध आहे. केंद्राच्या योजनेतून राज्यात पहिल्या टप्प्यात २५ लाख लखपती दीदी बनल्या असून एक कोटी लखपती दीदी बनविण्याचा संकल्प आहे. दोन कोटी २० लाख बहिणींना पैसे दिले असून नोव्हेंबरचे पैसेही जमा केले आहेत. ही योजना केवळ सणापुरती नव्हे तर यापुढेही सुरू राह‌णार आहे. उपसा सिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरणामुळे विना बोजबिल पाणी मिळेल.

केंद्राच्या २९ हजार कोटींतून नवे ट्रान्सफॉर्मर्स, उपकेंद्र उभे राहतील. पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींची कामे केली. दुसऱ्या टप्प्प्यातील तीन हजार कोटीच्या कामाची आज सुरवात केली आहे. साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपाला मोफत वीजपुरवठा केली जात आहे. त्यासाठी वर्षाचे १४ हजार कोटी रुपये वीजबिल सरकार भरत आहे.

याप्रसंगी सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, शहाजी पाटील, सचिन कल्याणरोटी, समाधान आवताडे, ड्रीम सात्पुते हे आमदार,माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वाः स्वामी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापाल्मिकी आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा मंरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक अतुल कुलकणों आदी उपस्थित होते. आजारी असल्याने मुख्यमंत्री अनुपस्थित

■ मुख्यमंत्री लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले. ते आजारी असल्याने कार्यक्रमाला येऊ शकले नसल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांच्यासह शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी या सोहळ्याची चारवेळा तारीख बदलली. अखेर मंगळवारचा (ता. ८) दिवस ठरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT