Devendra Fadnavis Sakal
सोलापूर

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्र्यांचा मंगळवेढा दौरा, मराठा धनगर आरक्षण प्रश्नाला बगल

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्यात मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यांना बगल दिल्यामुळे या समाजांमध्ये नाराजी आहे. या निर्णयाचा आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या यशावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : तालुक्यातील 1100 शे कोटीच्या विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्यात सध्या गाजत असलेल्या मराठा व धनगर आरक्षणाच्या प्रश्नाला उपमुख्यमंत्र्यांनी बगल दिल्याने मतदार संघात सर्वाधिक असलेल्या मराठा व धनगर समाजातून नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाची जिल्ह्यात सर्वाधिक वनवा हा मंगळवेढा तालुक्यात पेटला. येथील मराठा बांधवांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वेगळ्या माध्यमातून पाठिंबा देण्याचे काम केले असतानाच मराठा आरक्षणावर निश्चित तोडगा न निघाल्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 45 हजार 523 मतांनी भाजपचा उमेदवार मागे राहिला तर मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनगर आरक्षणाचा प्रश्न देखील भिजत ठेवल्यामुळे तो ही समाज या मतदारसंघात निर्णयाक भूमिकेमध्ये आहेत.

अशा परिस्थितीत काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्यामध्ये त्यांच्याकडून या समाज बांधवांना दिलासादायक भाषण अपेक्षित होते. परंतु दुर्दैवाने राज्य सरकारने महिलांसाठी केलेल्या कामाचीच अधिक माहिती सांगत मतदारसंघात प्रभाव टाकणाऱ्या आरक्षण प्रश्नावर कोणते सुतोवाच केले नाहीत त्यामुळे या समाजबांधवात नाराज आहे त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मराठा धनगर आरक्षणाचा व विषय या पुढील काळात देखील कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उलट पोटनिवडणुकीच्या निमित्ताने धनगर समाजाचा मतासाठी आ.गोपीचंद पडळकर यांचा उपयोग केला मात्र यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान दिले नसल्यामुळे धनाजी गडदे याने सोशल मीडियात व्हिडिओ टाकत नाराजी व्यक्त केली त्यामुळे भाजप उमेदवाराला या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतील 45 हजार 523 मतात असणारा फरक कमी करण्यासाठी या दोन समाजाचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे.

अन्यथा विधानसभा निवडणुकीत देखील हे दोन समाज निर्णयाक भूमिका बजावू शकतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या मतदारसंघातील मतदाराचे आभार मानत तुमच्यामुळे मी महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला.यामुळे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी दिला मी माझी ताकद आ. समाधान आवताडे यांच्या पाठीशी लावली असून तुम्ही देखील त्यांना पुन्हा ताकद द्या.

या मतदारसंघाला एक नंबर बनवू असा शब्द यावेळी बोलताना दिला असला तरी पोट निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा गुलाल टाकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भागीदार केलेले प्रशांत परिचारकांनी काल दांडी मारल्यामुळे त्यांच्याविषयी त्यांनी एक शब्द देखील न उच्चारल्यामुळे मराठा धनगर समाजाबरोबर परिचारकांची भूमिका देखील भाजपसाठी निर्णयाक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT