सोलापूर

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे निकष बदला : शेतकऱ्यांची मागणी

महेश पाटील

सोलापूर जिल्ह्यातील एकही महसूल मंडळ या विमा योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले नाही व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे पैसे पाण्यात गेले.

सलगर बुद्रुक (सोलापूर) : कृषी क्षेत्राच्या व शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने फळपीकाच्या शेतीचा वाटा खूप मोठा आहे. पण नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात फळपीक शेतीचे नुकसान होत असते. या अनुषंगानेच शेतकऱ्यांना त्यांच्या फळपीक शेतीला नैसर्गिक आपत्ती, खराब हवामान या पासून वाचवण्यासाठी हवामान आधारित फळपीक विमा ही योजना (fruit crop insurance scheme) आजपर्यंत राबवण्यात येत होती. व या योजनेचा फायदाही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत होता. (farmers in solapur district are demanding a change in the criteria for the fruit crop insurance scheme)

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर जून २०२० मध्ये पुनरर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा जी आर काढण्यात आला. या जी आर मध्ये पूर्वीच्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील निकषांमध्ये बदल करुन नवीन निकष तयार करण्यात आले. व २०२०/२१, २०२१/२२, २०२२/२३ या तीन वर्षासाठी ही पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यास सुरवात केली. पण बदललेल्या निकषांमुळे सोलापूर जिल्ह्यातील एकही महसूल मंडळ या विमा योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले नाही व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे पैसे पाण्यात गेले.

काय होते आणि काय आहेत नवीन निकष

पावसाचा एक महिन्यापेक्षा जास्त खंड पडला नाहीतर जास्तीचा पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत होता. शिवाय दरवर्षी नवीन निकशासह ही योजना राबवली जात होती. पण नवीन निकषामध्ये सलग तीन वर्षांसाठी या योजनेचे एकच निकष ठेवण्यात आले आहेत. यात सततचा पाऊस, आर्द्रतेचे प्रमाण, गारपीट या बाबीचा समावेश आहे. यामध्ये कमीत कमी सलग पाच ते त्यापेक्षा जास्त दिवस २५ मी.मी.पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता, मोठया प्रमाणात गारपीट इ. नैसर्गिक आपत्ती आल्यास त्या महसूल मंडळाच्या गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो. दरम्यान, सोलापूर जिल्हा हा अवर्षण ग्रस्त जिल्हा आहे. या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असते. गारपिटीमुळे नुकसानही कमीच होते. शिवाय पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाणही जास्त नसते. या सर्व गोष्टीचा विचार केल्यास सोलापूर सारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळणे हे अशक्यच आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकरी या योजनेतील निकषामध्ये बदल करा, अशी मागणी करत आहेत.

तेल्या व कुजव्या रोगाचा समावेश व्हावा

या योजनेचे नाव हवामान आधारित फळपीक विमा योजना असे आहे. मात्र खराब हवामानामुळे दरवर्षी विशेषतः गेल्या वर्षी तेलकट डाग वाळला व ओला कुजवा या रोगांमुळे सोलापूर जिल्ह्यातील डाळींबाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कमी जास्त पाऊस, खराब हवामान, ढगाळ वातावरण या हवामानातील बदलामुळेच डाळींब बागा तेल्या व कुजवा या रोगाला बळी पडतात हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध आहे. व या रोगावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. त्यामुळे खराब हवामान व वातावरणातील बदलामुळे तेल्या व कुजव्या सारख्या रोगामुळे जर डाळींबाचे नुकसान होत असेल व या योजनेचे नावच हवामान आधारित फळपीक विमा योजना असेल तर या योजनेच्या निकषांमध्ये शासन स्तरावर बदल करण्यात आल्यास सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळेल असे जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे.

दरम्यान २०२०/२१ साली सोलापूर जिल्ह्यातील २४८९६ इतक्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय कृषी या विमा कंपनीकडे अर्ज केले होते. यात सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने डाळींब, लिंबू, चिक्कू इ. फळपिकांची शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब हे पीक घेतले जाते.

पंढरपूर मंगळवेढा विधान सभा सदस्य समाधान आवताडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पुनर्रचित हा शब्द वापरून नवीन निकषासह हवामान आधारित फळपीक विमा २०२० ते २३ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी ही विमा योजना कार्यान्वित करण्यात आली. पण नवीन जाचक निकषामुळे पहिल्याच वर्षी या विमा योजनेचा बोजवारा उडाला असून पहिल्याच वर्षी म्हणजे २०२०/२१ च्या वर्षात सोलापूर जिल्ह्यातील एकाही महसूल मंडळात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेले शेतकरी पात्र ठरले नाहीत. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे पैसे वाया गेले. या योजनेचे निकष बदलून खराब हवामानामुळे उत्पन्न होणाऱ्या तेलकट डाग व कुजवा या रोगांचा समावेश विमा योजनेच्या निकषात बसवण्याचा प्रयत्न करणार आहे.

सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने म्हणाले, नवीन निकषानुसार विचार केल्यास सोलापूर जिल्ह्यातील एकाही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ मिळणे कठीण आहे. सोलापूर जिल्ह्यात २०२०/ २१ ला मागील दहा वर्षांपेक्षा सर्वात जास्त म्हणजेच ७४८ मी.मी एवढा पाऊस होऊन सुद्धा कोणत्याच महसूल मंडळात सलग पाच किंवा त्यापेक्षा जास्त दिवस २५ मी.मी.दररोज पाऊस झाला नाही. त्यामुळे या विमा योजनेतील निकष बदलाविषयी पुनर्विचार व्हावा, या आशयाचे संबंध माहितेचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने महाराष्ट्र् राज्य कृषी आयुक्तालयाला पाठवले होते. पण निकषात बदल न केल्याने सोलापूर जिल्ह्याला २०२०/२१ च्या विमा योजनेचा लाभ मिळाला नाही.

(farmers in solapur district are demanding a change in the criteria for the fruit crop insurance scheme)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT