सोलापूर : महिलांच्या संरक्षणासाठी सिंहगड अभियांत्रिकी कॉलेजमधील(Sinhagad Engineering College) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या अंतिम वर्षातील अंकिता रोटे हिने एक खास सूट तयार केला आहे. वरून तो साधा सूट वाटतो, परंतु संबंधित मुलीची तथा महिलेची छेडछाड झाल्यास त्यासंबंधीचा मेसेज तत्काळ पोलिस व तिच्या जवळच्या नातेवाईकांना जाणार आहे. त्यातून छेडछाड,(Tampering) धक्काबुक्कीच्या अपप्रवृत्तींना आळा बसेल, असा विश्वास अंकिताला आहे.
महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. शाळा, कॉलेजमध्ये महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देऊनही त्याचे प्रमाण थांबलेले नाही. गर्दीच्या ठिकाणी, शाळा, महाविद्यालयात, कामाच्या ठिकाणी ये-जा करताना तिला विविध त्रास सहन करावा लागतो. त्यातून महिलांची सुटका व्हावी, तिला सुरक्षित वाटावे म्हणून अंकिताने टेक्नॉलॉजीची जोड दिली. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेत अंतिम वर्षाला शिकणारी अंकिता आसिफा व निर्भया प्रकरणानंतर व्यथित झाली होती.
त्यानंतर तिने महिलांच्या रक्षणासाठी काहीतरी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. खूप विचार करून तिने प्रा. शशिकांत हिप्परगी, विभागप्रमुख डॉ. एस. एम. जगदे, प्रा. एस. एस शिरगण यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या स्वरक्षणासाठी खास सूट तयार केला. प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी तिला प्रोत्साहित केले. राज्यभर नव्हे तर देशभरातील महिला, मुलींना त्याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास अंकिताने व्यक्त केला आहे. चार हजार रुपयांच्या खर्चात तयार झालेल्या सुटची किंमत आणखी कमी होऊ शकते. आगामी काळात महिलांची मागणी पाहून सूट निर्मितीचा तिचा मानस आहे. अंकिताचे सर्वच स्तरातून कौतूक होत असून आता ती राज्य व केंद्र स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे.
सुटची खास वैशिष्टे...
आसिफा व निर्भया प्रकरणानंतर व्यथित अंकिता रोटेने महिला, मुलींच्या संरक्षणासाठी बनविला विशेष सूट
चार हजार रुपयांच्या खर्चातून तयार झाला सूट; उत्पादनानंतर सूटची आणखी कमी होईल किंमत
धक्काबुक्की, छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास सेन्सरद्वारे जवळच्या नातेवाईकास व पोलिसांना जातो मेसेज
शारीरिक हल्ला करण्याचा प्रयत्न करताना समोरील व्यक्तीचा सूटशी संपर्क येताच त्या व्यक्तीला बसतो विजेचा हलका शॉक
सूटमधील सेन्सरमध्ये संबंधितांचे क्रमांक फिड करून ठेवण्यात आले; त्याचा प्रयोग झाला यशस्वी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.