सोलापूर : शहर परिसरात वंचित, निराधारांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांना त्यांच्या कार्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतीची गरज उभी राहिली आहे. दरम्यान कठोर संघर्षातून या संस्थाचालकांनी त्यांचे गरजूंना मदत करण्याचे कार्य मागील अनेक वर्षापासून सुरु ठेवले आहे.
काही संस्थांसाठी सुस्थापित होण्यासाठी तर काही संस्थेत तत्काळ अन्नधान्याचा पुरवठा होण्याची गरज आहे. या संस्थाचालकांनी सोलापूरकरांना मदतीची हाक दिली आहे. वंचित तसेच निराधारांच्या पोटाला घास ठरविणाऱ्या संस्थांची धडपड सुरु आहे. त्यांच्या या धडपडीला यश येण्यासाठी सोलापूरकरांच्या ‘दातृत्वा’ला पाझर फुटण्याची आवश्यकता आहे.
प्रार्थना फाउंडेशनला हवी तत्काळ मदत
सोलापूर; प्रार्थना फाउंडेशन ही वंचित व निराधार मुलांना सावली देणारी संस्था आहे. या संस्थेत आता ५० निराधार बालकांनी आश्रय घेतला आहे. या शिवाय १५ वृद्धांनी देखील संस्थेचा आश्रय घेतला. त्यामुळे आता एकूण ७० जणांचा हा परिवार झाला आहे.
या संस्थेतील आश्रितांना अंदाजे २० हजार रुपयांचा किराणा दर महिन्याला लागतो. या शिवाय मुलांना व वृद्धांना कपडे, कपाट, खाटा, अभ्यास पेट्या, वॉटर हिटर, मुलांना शाळेत ये-जा करण्यासाटी स्कूलबस अशा अनेक बाबींची गरज निर्माण झाली आहे.
अशी करा मदत ः खातेदाराचे नाव - Prathana Foundation
बॅंकेचे नाव- आयडीबीआय बॅंक, खाते क्र. - 0410104000158862
आयएफएसी कोडः IBKL0000410, बॅंक शाखाः विजापूर रोड
फोन पे नं : 9545992026, गूगल पे नं : 9049063829
वंचित मुलांना हवी निवाऱ्यासाठी मदत
सोलापूर ः मुळेगाव तांडा येथे संस्कार संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित विद्यार्थी आश्रम चालवला जातो. या संस्थेत गरजू व निराधार मुलांना निवासी वसतीगृहात राहून त्यांचे शिक्षण केले जाते. सध्या एकूण ४२ मुले संस्थेत शिक्षण घेत आहेत.
मागील काही वर्षात या संस्थेतून पाच मुले दहावी झाली तर काही मुले उच्च शिक्षणासाठी बाहेर पडली. आता संस्थेने या मुलांसाठी जागा घेऊन सहा खोल्याचे बांधकाम सुरु केले आहे. या ठिकाणी बोर घेतल्यावर बोरला पाणी लागले आहे. बांधकामासाठी सर्व प्रकारचे मदतीची गरज आहे.
अशी करावी मदत ः
खातेदाराचे नाव ः Sanskar Sanjivani Foundation
बॅंकेचे नावः bank of India खाते क्र. ः 070610110010242
बॅंक शाखेचे नाव ः आयएफएसी कोडः BKid0000706
एमआयएससी कोडः 413013006 गुगल किंवा फोन पेः ९८८१५५९४१६
मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी हवी रुग्णवाहिका
सोलापूर ः शहरात अनेक मनोरुग्ण रस्त्यावर आढळतात. त्यांची भेट घेऊन त्यांची संकटातून मुक्तता करत त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबात पोचवण्यासाठी संभव फाउंडेशन काम करते. या फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात अनोळखी, एकाकी मनोरुग्णांचा शोध घेतला जातो.
तसेच त्यांच्या कुटुंबाचा शोध घेतला जातो. तसेच त्यांच्यावर मानसोपचार करून त्यांच्या घरी सुखरूप सोडले जाते. आतापर्यंत विविध राज्यातील २७० मनोरुग्णांचे या माध्यमातून पुनर्वसन केले आहे. या रुग्णांच्या वाहतुकीसाठी एक ॲम्ब्यूलन्स हवी आहे.
अशी करावी मदत ः बॅंक खातेदाराचे नाव : Sambhav Foundation, Solapur, बॅंकेचे नाव : BANK OF INDIA, बॅंक शाखेचे नावः Subhash Chowk, Solapur, बॅंक खाते क्रमांक : 070110110020789,
आयएफएसी कोडः BKID0000701,
फोन पे किंवा गुगल पै : 9765065098
नागरिकांनी या कामासाठी आर्थीक मदत करणे आवश्यक आहे. संस्थेतील आश्रितांची संख्या अधिक असल्याने मदतीची गरज देखील वाढली आहे.
- प्रसाद मोहिते, प्रार्थना फाउंडेशन, सोलापूर
वंचित मुलांसाठी काम करत असताना त्यांना कायमस्वरुपी निवारा मिळावा म्हणून जागा घेतली आहे. आता या ठिकाणी सहा खोल्याचे बांधकाम सुरु केले आहे. या बांधकामाला मदत मिळाल्यास हा निवारा उभा राहणार आहे.
- परमेश्वर काळे, संस्कार संजीवनी फाउंडेशन, सोलापूर
मनोरुग्णांना सध्या बुलडाणा येथील संस्थेमध्ये मानसोपचारासाठी न्यावे लागते व नंतर त्यांच्या मुळ गावाचा शोध घ्यावा लागतो. शेवटी या रुग्णाला त्याच्या कुटुंबात नेऊन सोडावे लागते. या कामासाठी एक ॲम्ब्यूलन्स घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मदतीची गरज आहे.
- आतिश सिरसाठ, संभव फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.