बहुतांश गावांना पाण्याने वेढले आहे. पाण्याने गावेच्या गावे विळख्यात घेतली आहेत.
केत्तूर (सोलापूर) : कोकणात (Konkan) मोठ्या प्रमाणावर धुवॉंधार पाऊस होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रायगड (Raigad), चिपळूण (Chiplun), महाड (Mahad) आदी भागातील नद्या आणि धबधबे पुराच्या (Flood) पाण्याने ओसंडून वाहत आहेत. काही गावांत पाणी शिरल्याने गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे. रस्ते, पूल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत तर बहुतांश गावांना पाण्याने वेढले आहे. पाण्याने गावेच्या गावे विळख्यात घेतली आहेत. अशा परिस्थितीत नागरिक घरातच अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अशा या परिस्थितीत मुख्यमंत्री कार्यालयास (Chief Minister's Office) संपर्क साधून केलेल्या एका ट्वीटमुळे व या ट्वीटची मुख्यमंत्री कार्यालयाने तत्परतेने दखल घेतल्याने 15 जणांचे प्राण वाचल्याची घटना घडली आहे. (Fifteen people trapped in the flood were saved due to the tweet of a youth from Washimbe-ssd73)
याबाबत माहिती अशी की, वाशिंबे (ता. करमाळा) (Karmala) येथील युवक अतुल राजाभाऊ पाटील (Atul Patil) हा वर्षभरापूर्वी चिपळूण येथे बीएस्सी ऍग्री (B.Sc. Agri) शिक्षण घेत होता. तो भाड्याने राहात असलेल्या ठिकाणचे लोक पाण्याने वेढा दिल्याने अडकून पडले होते. त्यांनी मदतीसाठी अतुल पाटील याच्याशी संपर्क साधला असता पाटीलने मुख्यमंत्री कार्यालयाला केलेल्या एका ट्वीटमुळे पंधरा नागरिक व एका गरोदर महिलेचे प्राण वाचले आहेत.
चिपळूण येथील कळंबस्ते भाग शाळेजवळ वशिष्ठी नदीला गुरुवारी पूर आल्याने तेथील नागरिकांनी घराच्या छताचा आसरा घेतला होता. परंतु पावसाचा जोर वाढल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे संपूर्ण घर पाण्याखाली जाण्याची शक्यता होती. पीडित नागरिकांनी मोबाईलद्वारे संपर्क करून मदतीसाठी आपल्या मित्रांना व नातेवाइकांना आवाहन केले. यामध्ये अतुल पाटील याच्याशी संपर्क होताच पाटीलने तत्काळ मुख्यमंत्री कार्यालयाला ट्वीट करत संबंधित ठिकाण व पीडितांचा मोबाईल क्रमांक पाठवत मदतीची विनंती केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पीडितांशी संपर्क साधून तत्काळ एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या पाचारण करून पीडितांना सुखरूप बाहेर काढले. अतुलच्या कार्यतत्परतेचे कौतुक संपूर्ण समाज माध्यमातून होत आहे.
चिपळूणमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या जवळचे संबंध असणाऱ्यांनी मला संपर्क साधला. मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत ट्वीट केले असता शासकीय यंत्रणा याबाबत किती सतर्क आहे, याची प्रचिती आली. ट्वीट केल्यानंतर अर्ध्या तासातच त्याची दखल घेतली गेली व पुरात अडकलेल्यांचे प्राण वाचले, याचे मनोमन समाधान वाटत आहे.
- अतुल पाटील, वाशिंबे, ता. करमाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.