बार्शी : शहरातील नाईकवाडी प्लॉट येथे राहणाऱ्या अवैध सावकाराने नोंदणीकॄत सावकारी परवाना नसताना सुमारे 33 जणांना रकमा दिल्या असून त्यांचे धनादेश,कोरे स्टॅम्प पेपर,पावत्या,कब्जे साठेखत असा ऐवज जप्त करण्यात आल्या असून बार्शी शहर पोलिस ठाण्यात अवैध सावकारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Filed a case against one illegal lender in Barshi)
रंजेश बबनराव मुसळे(रा.नाईकवाडी प्लॉट)असे गुन्हा दाखल झालेल्या अवैध सावकाराचे नाव आहे सहाय्यक निबंधक सचिन महाडिक यांनी फिर्याद दाखल केली 20 डिसेंबर 2021 रोजी छापा टाकल्यानंतर तपास करुन 30 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मुसळे याचेविरोधात अनिल खाडे(रा.दत्तनगर)यांनी सहायक निबंधकाकडे तक्रार केली होती खाडे यांनी कर्ज घेतले होते व बेकायदेशीर वसुली केल्याने खाडे यांनी विष प्राशन केले होते त्यामुळे मुसळे यांचे घरी व भगवंत मंदिराजवळ असलेल्या दुकानावर पोलिसांच्या मदतीने छापा टाकून कागदपत्रे जप्त केली होती.(illegal lending business)
मुसळे फायनान्स कार्पोरेशन नावाने कोरी डेली वसुली तक्ता,तसेच अठरा जणांना दिलेल्या कर्जाच्या रकमांचा तपशील तसेच रेखा पवार,हनुमंत खुने,लक्ष्मण पतंगे,आकाश मस्के,भानुदास पतंगे,वृषभ बलदोटा,पृथ्वीराज पाटील,सुशांत फल्ले,दिपक कट्टीमनी,राहुल जाधव,चंद्रसेन गाढवे,विकास शेटे,सागर गुंड,यशवंत गुंड,यांचे कोरे धनादेश,कोरे स्टॅम्प पेपर तसेच डांगे,शेंडगे यांचे कब्जे साठेखत आदि साहित्य आढळून आल्याने बेकायदेशीर सावकारी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार दखलपात्र गुन्हा नोंद करावा असे फिर्यादीत म्हटले आहे तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार करीत आहेत.(Solapur police)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.