विद्यामंदिर संस्थेची फसवणूक! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेसह लिपिकावर गुन्हा Canva
सोलापूर

'विद्यामंदिर'ची फसवणूक! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेसह लिपिकावर गुन्हा

विद्यामंदिर संस्थेची फसवणूक! सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेसह लिपिकावर गुन्हा

श्रीनिवास दुध्याल

जहागीरदार व रणदिवे यांनी पेन्शन प्रस्तावावर अध्यक्षाचा बनावट शिक्का मारून त्यावर संस्थेचे अध्यक्ष जयंत भूमकर यांच्या खोट्या सह्या केल्या.

वैराग (सोलापूर) : वैरागमधील विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका आणि वरिष्ठ लिपिक या दोघांनी संगनमत करीत आर्थिक लाभासाठी बनावट कागदपत्रे तयार करून बनावट सह्यांच्या सहाय्याने संस्थेची व शासनाची फसवणूक (Fraud) केल्याबाबतची फिर्याद संस्थेच्या अध्यक्षांनी वैराग पोलिसांत दिली आहे. याबाबत या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा (Crime) नोंदविण्यात आला आहे.

वैरागमधील विद्या मंदिर ही नामांकित संस्था असून धन्यकुमार भूमकर, जयंत भूमकर यांच्यानंतर भूषण भूमकर हे संस्थेचे अध्यक्ष राहिले आहेत. 1954 साली स्थापन झालेल्या विद्यामंदिर संस्थेच्या विद्या मंदिर कन्या प्रशाला, विद्या मंदिर हायस्कूल व चांगदेव घोडके प्रशाला, मालेगाव अशा तीन शाखा कार्यरत आहेत. मुख्याध्यापिका जिन्नत जहागीरदार या विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या 2009 ते 2014 पर्यंत कार्यरत होत्या. याच दरम्यान विद्या मंदिर कन्या प्रशालेचे नंदकुमार धन्यकुमार रणदिवे हे 2005 पासून 2017 पर्यंत वरिष्ठ लिपिक होते. जहागीरदार व रणदिवे यांनी पेन्शन प्रस्तावावर अध्यक्षाचा बनावट शिक्का मारून त्यावर संस्थेचे अध्यक्ष जयंत भूमकर यांच्या खोट्या सह्या केल्या. तसेच तारीख असलेले व नसलेले दोन कव्हरिंग लेटर लावलेले आहेत. त्या प्रस्तावावरील अध्यक्षांचा बनावट सही-शिक्का मारला आहे. तसेच जहागीरदार यांच्या सेवा पुस्तकांमधील रजेचा तपशील बनावट आहे. 1 जुलै 2012 ते 30 जून 2013 या कालावधीत सेवापुस्तकातील सेक्रेटरीच्या सह्या लिपिक नंदकुमार रणदिवे यांनी बनावट केल्या आहेत.

लिपिक रणदिवे यांचा पुतण्या मनोज बाहुबली रणदिवे अर्धवेळ ग्रंथपाल असताना पूर्णवेळ ग्रंथपाल करण्यासाठी नियमबाह्य प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संगनमत करून शासनाची व संस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड करत आहेत.

बातमीदार : बलभीम लोखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT