अखेर अकलूज नगरपरिषद, नातेपुते नगर पंचायत जाहीर! 
सोलापूर

अखेर अकलूज नगरपरिषद, नातेपुते नगर पंचायत जाहीर !

अखेर अकलूज नगरपरिषद, नातेपुते नगर पंचायत जाहीर !

सुनील राऊत

तीन आठवड्यात याबाबत अध्यादेश काढावा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 17 जुलै रोजी दिले होते.

नातेपुते (सोलापूर) : अकलूज-माळेवाडी (Akluj-Malewadi, District Solapur) नगरपरिषद व नातेपुते (Natepute) येथे नगरपंचायत स्थापन करण्याची अधिसूचना राज्य सरकारचे उपसचिव सतीश मोघे यांनी राज्यपालांच्या सहीनिशी काढली आहे. दरम्यान, तीन आठवड्यात याबाबत अध्यादेश काढावा, असे आदेश उच्च न्यायालयाने (High Court) राज्य सरकारला 17 जुलै रोजी दिले होते. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अकलूज-माळेवाडी व नातेपुते ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे.

याबाबत 19 सप्टेंबर 2019 रोजी पहिला अध्यादेश निघाला होता. त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले व अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगर पंचासतीचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने ऍड. अभिजित कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याला मंगळवारी न्याय मिळाला. हा प्रश्न सहमतीने सोडवला जावा यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील (Vijaysinh Mohite-Patil) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी (Governor Bhagat Singh Koshyari), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना समक्ष भेटून विनंतीही केली होती.

हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी गेली 43 दिवस अकलूज येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू होते. या उपोषणस्थळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्ह्यातील भाजपच्या सर्व आमदारांनी भेटी देऊन पाठिंबा दिला होता. आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, धैर्यशील मोहिते- पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.

अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगर पंचायतीबाबत अंतिम अधिसूचना निघाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अकलूज, नातेपुते, माळेवाडी येथे फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. नेतेमंडळींनी एकमेकांना फोन करून शुभेच्छा दिल्या. भावी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि त्यांचे समर्थक फटाक्‍यांची आतषबाजी करीत आहेत. माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांना आज (बुधवारी) या तिन्ही ग्रामपंचायतींची सूत्रे देण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना फक्त सहा महिने काम करण्यास मिळाले आहेत. आता नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी नव्याने प्रभाग रचना होऊन निवडणूक कार्यकम जाहीर होईल. एकूणच, माळशिरस तालुक्‍यात राज्य शासनाच्या या अधिसूचनेमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसेनेचे शिष्टमंडळ मुंबईत तळ ठोकून

अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायत होण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ मागील तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना भेटून सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आणि तसे पत्र शिष्टमंडळास नगर विकास मंत्री यांनी दिले. या शिष्टमंडळात शिवसेनेचे धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, दत्ता पवार, नामदेव वाघमारे, प्रमोद अण्णा कुलकर्णी यांचा समावेश होता. मंगळवारी सायंकाळी नगर परिषद व नगरपंचायतीचे पत्र दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्र्यांचे आभार मानले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना याबाबत सर्व पूर्तता झाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर सरकार बदलले व हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. तो आता निकाली निघाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानतो. या निर्णयासाठी अकलूज, माळेवाडी, नातेपुते येथील नागरिक व पदाधिकाऱ्यांनी मोठा पाठपुरावा केला. त्यांची एकी व सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना आलेले हे यश आहे.

- रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार, विधान परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT