fire brigade technology british era tap use even now solapur history revealed Sakal
सोलापूर

History of Solapur : अग्निशमन यंत्रणेचे ब्रिटिशकालीन नळ आजही वापरात

पूर्वीच्याकाळी आपत्कालीन घटनांसाठी वापर; आता भागवितात जनसामान्यांची तहान

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : ब्रिटिश काळात शहराचा परीघ अत्यंत कमी होता. तरीही काही आगीची वगैरे घटना घडली तर दुर्घटनास्थळी त्वरित मदत पोचावी, यासाठी ब्रिटिशांनी त्याकाळच्या शहराच्या हद्दीत विविध ठिकाणी नळ उभारले होते. शहरात आजही ही यंत्रणा असून त्यापैकी मोजकेच नळ इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.

आग विझविण्यासाठी पाणी पुरवठा होऊ शकेल, असे लोखंडी पाइप व ओतीव लोखंडाचे विशिष्ट मोठे नळकांडे व नळ सोलापुरात आजही काही ठिकाणी आहेत. मधला मारुती, तेलंगी पाच्छा पेठ, जोडबसवण्णा चौकाजवळील, विजयदत्त फोटो स्टुडिओ शेजारी मुख्य रस्त्यालगत याची शेवटची खूण अजूनही दिसून येईल.

विशेष म्हणजे आजही या नळाला २४ तास पाणी असते. सोलापुरात ही ब्रिटिशकालीन यंत्रणा कार्यान्वित होती. हिप्परगा तलावातून जेथे जेथे ग्रॅव्हिटीने म्हणजे गुरुत्वाकर्षणाने पाणी येते, त्या परिसरात आजही ओतीव लोखंडाचे हे भलेमोठे नळ दिसून येतील.

सार्वजनिक नळाद्वारे पाणी वितरण यंत्रणा नव्हे, तर आग विझविण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त होती. रहदारीच्या चौकालगत असे नळ उभारले गेले होते. पाण्यासाठी मुख्यतः विहिरी कार्यान्वित होत्या. त्यापैकी जुनी मिल कंपौंडमधील विहिरीचे तर पूर्ण मिलसाठी पाणी पुरायचे.

त्या पाण्याच्या वाफेद्वारे मिलमधील यंत्रणेद्वारे वीज निर्मिती व्हायची व सोलापूर वासियांसाठी वीजही मिळायची. अर्थात तेव्हा शहर अगदी छोटे म्हणजे मिल परिसर, गावठाण भाग आणि जास्तीत जास्त लक्ष्मी मंडई परिसरापर्यंत इतकेच होते.

ओतीव लोखंडाचे असे नळ जागोजागी उभारलेले दिसून येतात. काही कार्यान्वित आहेत तर अनेक ठिकाणी त्याची उपयुक्तता संपली असल्याने दुर्लक्षित आहेत

जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने याला विशेष महत्त्व निश्चित आहे. कंबर तलाव परिसर लष्करी दलासाठी राखीव, पाणीही लष्करालाच. कंबर तलावाचा परिसर हा लष्करी दलासाठी राखीव होता.

या तलावातील पाणी लष्करासाठी राखीव असायचे. होटगी तलाव, हिप्परगा तलाव याची निर्मिती याच ब्रिटिश काळातील. भवानी पेठ पाणी गिरणी व त्यातील पाणी व्यवस्थापन ही ब्रिटिशकालीन आहे. त्याची उपयुक्तता आजही तेवढीच असल्याचे लक्षात येईल.

तेलंगी पाच्छा पेठेतील ब्रिटिशकालीन ओतीव लोखंडापासून तयार केलेली अग्निशमन यंत्रणेतील शेवटची खूण आजही सुरु आहे. या नळाला २४ तास पाणी येते. जलतज्ज्ञांच्या मते पूर्वी ग्रॅव्हिटी पद्धतीने पाणी वितरण यंत्रणा होती. त्यामुळे पाणी वितरणातील ही यंत्रणा आजही तसेच कार्यान्वित आहे.

- दिलीप दुबे, माजी अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ नॉर्थ इस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT