1Pune_Seal (1).jpg 
सोलापूर

महापालिका आयुक्‍तांच्या आदेशानुसार पहिली कारवाई ! हिंदुस्थान बेकरी 30 दिवसांसाठी सील

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनासंबंधी निर्बंध घातलेले असतानाही त्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिंदुस्थान बेकरीला पोलिसांनी 23 मार्च रोजी दोन हजारांचा दंड केला होता. मात्र, तरीही नियमांचे पालन न केल्याने आज पोलिसांनी ती बेकरी 30 दिवसांसाठी सील केली. ही कारवाई एमआडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार, पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ सिद, सहायक पोलिस निरीक्षक नितीन पेटकर यांनी केली. महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार झालेली ही पहिलीच कारवाई आहे.

ठळक बाबी...

  • महापालिका आयुक्‍तांच्या आदेशानुसार 23 मार्च रोजी हिंदुस्थान बेकरीवर केली होती दंडात्मक कारवाई
  • पहिल्यांना सूचना देत दोन हजारांचा वसूल केला होता बेकरी चालकाकडून दंड
  • 27 फेब्रुवारीला पुन्हा बेकरी चालकांनी कोरोनासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे पोलिसांना आढळले
  • पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत बेकरीला 30 दिवसांसाठी लावले टाळे

शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सुधारित आदेश काढले. दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास अथवा मास्कविना ग्राहक किंवा दुकानदार दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सर्वप्रथम दंडात्मक कारवाई करुन सूचना केली जात आहे. तरीही नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित दुकान तथा आस्थापना 30 दिवसांसाठी सील करण्यासंदर्भात आयुक्‍तांनी आदेश काढले. त्यानुसार नई जिंदगी परिसरातील हिंदुस्थान बेकरीला पोलिसांनी आज टाळे ठोकले. त्यात फारुख गुलाबसाब सौदागर, अ.सत्तार नदाफ यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांनी सांगितले. कोरोना वाढत असतानाही त्यांनी नियम पाळले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. सहायक पोलिस आयुक्‍त कमलाकर ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुकानांवर वॉच ठेवावा, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन सूचना द्यावी. नियम पाळले जात नसतील तर ते दुकान 30 दिवसांसाठी सील करावे, असे निर्देश पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT