सव्वादोन कोटी खर्चून अक्कलकोटला साकारले डिजिटल क्‍लासरूम्स Canva
सोलापूर

सव्वादोन कोटी खर्चून अक्कलकोटला साकारले डिजिटल क्‍लासरूम्स

सव्वादोन कोटी खर्चून अक्कलकोटला साकारले डिजिटल क्‍लासरूम्स

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट येथील शासकीय निवासी शाळेत नावीन्यपूर्ण योजनेतून डिजिटल क्‍लासरूम साकारण्यात आले आहेत.

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट (Akkalkot) येथील शासकीय निवासी शाळेत (Government residential school) नावीन्यपूर्ण योजनेतून डिजिटल क्‍लासरूम (Digital Classroom) साकारण्यात आले आहेत. यासाठी शासनाने दोन कोटी 27 लाख रुपये खर्चून पाच अद्ययावत डिजिटल वर्ग तयार केले आहेत. यामुळे दोनशे मुलांना अद्ययावत संगणकीकृत शिक्षणाची सोय झाली आहे. समाजकल्याण विभागाच्या (Department of Social Welfare) शाळेत सहावी ते दहावीच्या दोनशे विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सांगणकीय शिक्षण मिळणार असल्याने ग्रामीण भागातही आता वंचित विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळणे सोयीचे झाले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांसाठी नव्या इमारतीत शाळा सुरू झाली आहे. अभिनव उपक्रमांतर्गत सहावी ते दहावीच्या मुलांसाठी निवासी शाळा आहे. वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आणि महापुरुषांच्या विचारातील स्वप्ने साकारण्यासाठी शासनाने हा उपक्रम राज्यात सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अक्कलकोटमध्ये डिजिटल निवासी शाळा प्रत्यक्षात साकारली आहे. सहावी ते दहावीच्या डिजिटल क्‍लारूमममध्ये प्रत्येकी 40 डेस्कवर संगणक बसवून सज्ज झाले आहेत.

इयत्ता सहावी ते दहावी या प्रत्येक वर्गासाठी डिजिटल क्‍लासरूम सुरू करण्यात आले आहेत. यात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळा टॅब उपलब्ध आहे. यात इंटरनेटची सुविधा असून, पूर्ण वाय-फाय कॅम्पस आहे. एकूण शाळेची विद्यार्थी संख्या दोनशे असून प्रत्येक वर्गात 40 विद्यार्थी ई-लर्निंग करतील अशी व्यवस्था आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधेची उपलब्धता झाली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा लाभ

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांसाठी नव्या इमारतीत शाळा सुरू झाली आहे. अभिनव उपक्रमांतर्गत सहावी ते दहावीच्या मुलांसाठी निवासी शाळा आहे. वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आणि महापुरुषांच्या विचारातील स्वप्ने साकारण्यासाठी शासनाने हा उपक्रम राज्यात सुरू केला आहे. प्रत्येक वर्गात 40 विद्यार्थी ई-लर्निंग करतील अशी व्यवस्था आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधेची उपलब्धता झाल्याने विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.

- एम. आर. करजगीकर, मुख्याध्यापिका, शासकीय निवासी शाळा, अक्कलकोट

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

बाल्कनीच्या कठड्यावर पाय मोकळे सोडून ती... दिव्या भारती कशी पडली? २१ वर्षानंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

अशी ही बनवाबनवीच्या यशात महेश कोठारेंचाही होता वाटा ; सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर निर्मात्यांनी दिली शाबासकी

Assembly Election 2024: पंतप्रधानांच्या प्रचार दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला दीड तास उशीर?

Uddhav Thackeray: भिवंडीत माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची हकालपट्टी, उद्धव ठाकरेंवर केली होती टीका

SCROLL FOR NEXT