मोहोळ : सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेला "स्वच्छ शाळा सुंदर शाळा" हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, तो राज्यभर राबवु, तुम्ही किती मोठया श्रीमंताच्या घरात जन्मला यापेक्षा तुमचे शिक्षण किती आहे याला महत्त्व आहे, भविष्यात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही सर्व शाळा या गुणवत्ता पूर्ण झाल्या पाहिजेत, चालू वर्षापासून पाच टक्के निधी हा शाळेसाठी खर्च करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून तशा आशयाचा आदेश काढला आहे. शिक्षकांना कोरोना च्या काळात शासनाने पूर्ण पगार दिला आहे, शिक्षणाच्या माध्यमातुन त्याचा बॅकलॉग त्यांनी भरून काढावा, पापरी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचे नाव राज्य पातळीवर न्यावे शाळेचा परिसर व अन्य बाबी बघून समाधान वाटल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमात पापरी शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला होता. त्याचा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते संपन्न झाला होता, त्यावेळी पुरस्कार स्वीकारणारे पापरी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत खताळ यांना मोहोळच्या दौऱ्यावर आल्यावर पापरी शाळेला नक्की भेट देईन असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले होते, त्याची पूर्तता उपमुख्यमंत्री पवार यांनी शनिवारी शाळेला भेट देऊन केली त्यावेळी ते बोलत होते. पालक मंत्री दत्तात्रय भरणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी शाळेच्या वर्गखोल्याना भेट देऊन शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती घेतली. इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पवार यांनी 12 चा पाढा व मुळाक्षरे म्हणण्यास सांगितले, विद्यार्थ्यांनीही तेवढ्याच धैर्याने पाढा म्हणून मुळाक्षरे वाचून दाखविली. शाळेचा परिसर वृक्षारोपन पाहून पवार यांनी समाधान व्यक्त केले.
पापरी ची जिल्हा परिषद शाळा ही सातशे पटसंख्या असणारी जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. विद्यार्थी ची पटसंख्या जास्त असल्याने वर्गखोल्या कमी पडतात,त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने उपमुख्यमंत्री पवार यांना जागेची अडचण सांगितली व शाळेच्या पाठीमागे असलेल्या गायरानातील जागेची मागणी केली, त्यावर पवार यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना तातडीने सकारात्मक प्रस्ताव तयार करून मंजुरी ला पाठवण्याची सूचना दिली. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, त्या पार्श्वभूमीवर पापरी येथील सैनिकांचा सत्कार उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमा बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे पवार यांनी कौतुक केले. सत्कारा वेळी पवार यांनी सैनिकांना तुम्हाला पेन्शन किती मिळते, यासह अन्य अडचणी जाणून घेतल्या. सैनिकांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान आहे याचा आदर्श आत्ताच्या तरूण पिढीने घेण्याची अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या समवेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मोहोळ चे आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, मोहोळ चे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, माजी उपसभापती मानाजी माने, धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, शफी इनामदार, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संतोष पवार, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी, विस्ताराधिकारी सिद्धेश्वर निम्बर्गी, विकास यादव,नंदकुमार बागवाले, सरपंच जयश्री कोळी, शंकरराव कोळी, उपसरपंच अमोल भोसले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके, उपाध्यक्ष समाधान सावंत, पद्माकर भोसले, दिगंबर माळी, भीमा चे संचालक राजेंद्र टेकळे, सौदागर खडके, पिंटू गायकवाड, रवी पाटील, बाळासाहेब टेकळे,सज्जन टेकळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामसेवक अनंत नकाते, गाव कामगार तलाठी चक्रधर अचलारे, शंकर भोसले, सतीश भोसले यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.