follow this tips for healthy easy recipe kids lunch box by pramila chorgi solapur sakal
सोलापूर

Kids Lunch Box : मुलांच्या डब्याची चिंता करणं सोडा, या टिप्स घ्या लक्षात !

सकाळ वृत्तसेवा

- प्रमिला चोरगी

सोलापूर : मुलांच्या शाळा सुरू झाल्या की प्रत्येक आईसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सकाळी-सकाळी डब्याला काय द्यायचं. सकाळच्या सत्रात शाळेला जाणाऱ्या मुलांच्या कधी पोहे, उपीट असे झटपट बनविण्याकडे बहुतांश महिलांचा कल असतो.

परंतु, आहाराबाबत शाळादेखील सतर्क झाल्याने सकाळच्या घाईत रोज पोहे आणि उपीट देऊन मुलांचे त्यातून पोषण होत नाही. त्यामुळे मुलांच्या डब्याला पोळी-भाजी देणे बंधनकारक केले आहे.

त्यामुळे डब्याला तर काही उच्चभ्रू सोसायटीतील नागरिकांसाठी असलेले बलाढ्य शाळांनी मुलांच्या पोषणआहारापोटी मेसदेखील सुरू केली आहे. चला तर मग कमी वेळेत पोषणतत्व असलेले कोणते पदार्थ डब्याला देता येईल, ते पाहू या.

मुलांच्या टिफिनसाठी या सोप्या रेसिपीज...

लहान मुलं आवडीने पराठे खातात. पण बऱ्याचदा मेथी, बटाटा अशा काही ठराविक भाज्यांचे पराठे तयार करून मुलांना दिले जातात. त्याचबरोबर जर फ्लॉवर, गाजर, बीट अशा इतरही भाज्यांचे पराठे करून मुलांना डब्यात दिले तर सर्वच प्रकारच्या भाज्या खाण्याची सवय लागेल.

एखादे कडधान्य भिजवून त्याला मोड आणावेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात. या कडधान्याची उसळ करून त्यावर कांदा, काकडी, टोमॅटो, कोथिंबीर असे द्यावे. सकाळच्या सत्रात शाळा असलेल्या मुलांसाठी कडधान्य हा नाश्त्यासाठी अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच त्यासोबत सलाड पोटात जात असल्याने आणखी चांगले.

जर उपीटामध्ये पोह्याचाच मेनू आवडत असेल तर ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा भरड्याचा उपीट बनविणे योग्य ठरेल. एखाद्या मुलाला जर गोड पदार्थ आवडत असेल तर गव्हाची लापशी आणि तूप हा पदार्थ शरीरासाठी उत्तमच आहे.

सलाड हा सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. यामध्ये पनीर, टोफू, मशरूम असे काही असेल तर आणखीनच चांगले. यामध्ये आपण काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, कोबी, ग्रीन सलाड, कोथिंबीर, कांदा यांचा समावेश करू शकतो. यात चवीसाठी मिरपूड पोटभरीचा आणि हेल्दी पदार्थ डब्यासाठी चांगला पर्याय आहे.

उडीद, मुगाच्या डोसा अथवा चविष्ट दिरडी होऊ शकतात. डाळींमध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणात असल्याने अशी दिरडी आरोग्यासाठी अतिशय चांगली असतात. यामध्ये भरपूर कोथिंबीर घातल्यास त्याची पौष्टिकता आणखी वाढते.

मुलांना कधीही आवडणारा पदार्थ म्हणजे पुलाव. पोटात भाज्या जाव्यात यासाठी पुलाव उत्तम उपाय आहे. घरात असतील त्या फुलकोबी, मटार, फ्लॉवर, ढोबळी, गाजर अशा कोणत्याही भाज्या या पुलावामध्ये घालता येतात. काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र यांची फोडणी घालून शिजवलेला हा पुलाव चवीलाही चांगला लागतो.

‘हे’ पदार्थ देणे टाळा...

बहुतांश पालकांचा आपल्या सोयीने आणि मुलांच्या हट्टापायी शरीराला योग्य नसलेले पदार्थ देऊन वेळ मारण्याकडे अधिक कल असतो. त्यात मॅगी, पोहे, शेंगाचटणी-चपाती, वेफर्स, कुरकुरे, सॉस-चपाती, जाम-चपाती, चुरमुरे फरसाण, पनीर, चीज असे पदार्थ देतात.

परंतु, हा आहार मुलांच्या पोषणातत्वावर परिणाम करतो. मुलांची योग्य वाढ न होणे, लठ्ठपणा, भूक मंदावणे, बौद्धिक व शारीरिक क्षमता कमकुवत होणे. चुकीचा आहार घेणाऱ्या मुलांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असल्याने कोणत्याही मोसमात व्हायरल इन्फेक्शनचे ते बळी ठरतात. नकळतपणे मुलांचे आरोग्य धोक्यात घातले जाते.

वेगवेगळे पालेभाज्या व फळभाज्यांच्या पराठ्याला प्राधान्य द्यावे. मुलांना ज्वारी, नाचणी, बाजरीचा डोसा बनवून देता येऊ शकतो. उपिटंच करायचं तर ज्वारी, किंवा नाचणी, पोहे असतात. भरडा करून उपिट करता येते.

गोड पदार्थ आवडणारे असले तर गव्ह्याची लापशी करावी, विविध प्रकारच्या कडधान्याची उसळ, मुगाच्या डाळीची इडली, थालीपीठ आदी प्रकार बनविता येतात. पण पौष्टिक आहारातून जे पदार्थ बनविता येतील, त्यावर अधिक भर द्यावा. हे करीत असताना मुलांनादेखील घरातूनच पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य यांची माहितीदेखील होते.

- सोनाली घोंगडे, आहारतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पकडलेल्या दोघांपैकी एक यूपी तर दुसरा हरियानाचा

CM on Baba Siddique: सिद्दीकी हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Baba Siddiqui: कार्यक्रमाला उपस्थिती, फटाके फोडताना साधला डाव, वाचा बाबा सिद्धिकींचा हत्येचा थरार!

Baba Siddiqui Case: ...हे मोठं षडयंत्र; बाबा सिद्दिकींची हत्या चिंतेची बाब, भाजप नेत्याची प्रतिक्रिया

Samir Khan: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता अपघात

SCROLL FOR NEXT