forest department got success in preserve snake eggs and birth baby snake Sakal
सोलापूर

Solapur : कृत्रिम पद्धतीने सापांची अंडी उबविण्यात वनविभागाला यश

रामवाडी परिसरात एका घराच्या संरक्षक भिंतीच्या फटीत आढळलेली सात अंडी कृत्रिम पद्धतीने उबविण्यात वन विभागाला यश आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : रामवाडी परिसरात एका घराच्या संरक्षक भिंतीच्या फटीत आढळलेली सात अंडी कृत्रिम पद्धतीने उबविण्यात वन विभागाला यश आले आहे. १७ जुलैला सापडलेल्या या सातही अंड्यांतून २१ दिवसांनी बुधवारी (ता. ६) तस्कर जातीच्या बिनविषारी सापाची पिल्ले बाहेर आली. गुरुवारी (ता. ७) ऑगस्ट रोजी निसर्गात मुक्त करण्यात आली.

रामवाडी परिसरातील वसीम जमादार यांच्या घराच्या संरक्षक भिंतीत अंडी आहेत, अशी माहिती ता. १७ जुलै रोजी वन विभागाचे रेसक्युअर प्रवीण जेऊरे यांना मिळाली होती. ही अंडी सापाची असावीत, अशी शंका जमादार यांनी व्यक्त केली असता जेऊरे व तेजस म्हेत्रे यांनी घटनास्थळी पोचले. त्यावेळी ही अंडी सापाची असल्याचे त्यांना समजले समजले.

परंतु कोणत्या जातीच्या सापाची आहेत, हे समजणे कठीण होते. ही सात अंडी प्रवीण जेऊरे यांनी फटीतून सुरक्षित बाहेर काढली. बरणीत सुरक्षित ठेऊन त्यांनी सिद्धेश्वर वनविहारामध्ये एका मोठ्या बरणीत वाळू,कचखडी, पालापाचोळा, विटांचा चुरा, माती यांचे मिश्रण करून योग्य तापमान करून अंडी उबविण्यासाठी ठेवली होती.

नागपंचमी दोन दिवसांवर असताना सापांच्या सात पिल्लांना जीवनदान मिळाल्यामुळे वनविभागाचे कौतुक होत आहे. यासाठी उपवसंरक्षक धैर्यशील पाटील, सहा.वनसंरक्षक बाबा हाके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाने, वनपाल शंकर कुताटे, वनरक्षक श्रीशैल पाटील, वनविभाग रेस्क्यूअर प्रवीण जेऊरे, शंकर दोरकर, विक्रम सरवदे, महेश तडवळकर, वन्यजीव प्रेमी संस्थेचे सदस्य मुकुंद शेटे, तेजस म्हेत्रे यांनी परिश्रम घेतले.

तस्कर साप (बिनविषारी)

वैशिष्ट्ये- तस्कर बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट (Trinket) म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप आहे. तस्करचा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. हा साप शहरी भागात जास्त आढळतो. डिवचला गेला असता तोंड उघडून हल्ला करतो. दिवसा व रात्रीही आढळतो.

वास्तव्य अन्खाद्य

आढळ : मानवी वस्ती, उंदराचे बीळ, छोटी जंगले, अडगळीचे ठिकाण, खाद्य : छोटे उंदीर, पाली, सरडे, पक्ष्यांची अंडी, बेडूक आदी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT