शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पाठयपुस्तके.  esakal
सोलापूर

Samagra Shiksha Campaign : शाळेच्या पहिल्या दिवशीच मिळणार 'बालभारती'

Balbharati : समग्र शिक्षा अभियान; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Education in Solapur : समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. येत्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ११ पंचायत समिती स्तरावरुन मिळालेल्या मागणीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाकडे ई बालभारती पोर्टलवर चार लाख पाच हजार १०० पुस्तक संचाची मागणी नोंदवली आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद, शासकीय व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या चार लाख पाच हजार १०० इतकी आहे. त्यांच्यासाठी तेवढ्या पाठ्यपुस्तक संचाची मागणी नोंदवण्यात आली आहे. येत्या म्हणजे २०२४ -२५ या शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे.

त्यासाठी शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही मागणी करण्यात आली आहे. ही पुस्तके एकात्मिक स्वरुपाची असून मराठी, इंग्रजी, उर्दू व कन्नड माध्यमांचा यात समावेश आहे. पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्यानंतर तालुकास्तरावर पोहोचवली जाणार आहेत.

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, शाळेतील गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांत त्याचा सकारात्मक बदल दिसून येईल.

एक लाख ४५ हजार विद्यार्थ्यांना गणवेश

यंदा प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश मिळणार आहेत. त्यासाठी राज्य सरकार कापड पुरवणार असून बचत गटामार्फत त्या शिवून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने एक लाख ४५ हजार १४६ गणवेशांची मागणी नोंदवली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बीपीएल मुले, मुलींना हे गणवेश मिळणार आहेत. शिवाय सर्व मुलींना गणवेश देण्यात येणार आहेत.

विद्यार्थी संख्येनुसार पुस्तक संचाची मागणी पोर्टलवर नोंदवली आहे. कपडे शिवून मिळणार आहेत. त्यासाठी वर्गनिहाय मोजमापही निश्चित केले आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके देण्याचे नियोजन आहे. तसेच गणवेशाची मागणीही नोंदवली आहे. सरकार स्तरावरुन गणवेश पुरवले जाणार आहेत.

- कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT