Funny Cricket Umpire Sakal
सोलापूर

पंढरीतील अफलातून क्रिकेट अम्पायर; मायकेल वॉन, तेंडुलकरने घेतली दखल

नाईकनवरे यांच्या आगळ्या वेगळ्या स्टाईल मधील अपांयरिंगला मोठा प्रतिसाद मिळू लागला असून त्यांना अनेक मोठ्या शहरातून अपायरिंगसाठी आमंत्रित केले जाऊ लागले आहे.

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : अनेक नृत्य स्पर्धा गाजवलेल्या येथील दीपक नाईकनवरे (Dipak Naiknavre) यांच्या क्रिकेट मैदानावरील अफलातून अपायरींगच्या अदांची दखल इंग्लंडचा फलंदाज मायकेल वॉन (Michael Vaughan) आणि सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांनी घेतली आहे. नाईकनवरे यांच्या आगळ्या वेगळ्या स्टाईल मधील अपांयरिंगला मोठा प्रतिसाद मिळू लागला असून त्यांना अनेक मोठ्या शहरातून अपायरिंगसाठी आमंत्रित केले जाऊ लागले आहे.

राज्य पातळीवरील अनेक नृत्य स्पर्धा येथील दिपक नाईकनवरे यांनी गाजवलेल्या आहेत. त्याला नृत्या बरोबरच लहानपणापासून क्रिकेटची ही आवड आहे. त्याने तीन वर्षापूर्वी पासून नृत्या बरोबरच क्रिकेट अंपयारिंगचे कामही सुरु केले आहे.

क्रिकेट अपांयरिंगचे नियम वर्षानुवर्षे ठरलेले आहेत. त्यानुसार क्रिकेट मैदानावरुन अंपायर आऊट, नो बॉल, वाईड बॉल, लेग बाय, बाऊंडरी, सिस्कर या विषयी खुणा करुन निर्णय देत असतात. या वर्षानुवर्षाच्या पारंपारिक निर्णय देण्याच्या पद्धती ऐवजी आगळ्या वेगळ्या अफालातून पध्दतीने अंपायरिंग केले गेले तर उपस्थित प्रेक्षकांची खेळा बरोबरच अंपायरिंगने देखील करमणूक करता येईल असा विचार दीपक ने केला.

दिपकने आऊट, नो बॉल, वाईड बॉल, लेग बाय, बाऊंडरी, सिस्कर अशा अनेक प्रकारचे निर्णय देण्यासाठी नृत्याविष्कारासह काही नाविण्यपूर्ण खूणा तयार केल्या आहेत. पळत जाऊन चार रन चा इशारा, नाचत सहा रन चा इशारा, खाली डोके वर पाय करून वाईड बॉलचा इशारा अशा आगळ्यावेगळ्या, मैदानावर धमाल उडवून देणाऱ्या खूणा तयार केल्या आहेत.

दिपकचे अनाखे आणि गंमतशीर अंपायरीग पाहून उपस्थितांची मोठी करमणूक होत आहे. आता दिपकला राज्याच्या विविध भागात भरवल्या जाणाऱ्या क्रिक्रेट स्पर्धांच्या वेळी त्याच्या आगळ्यावेगळ्या अंपायरिंगसाठी खास आमंत्रित केले जाऊ लागले असल्याने दीपकचा उत्साह वाढला आहे.

सोशल मिडीयावरील दिपकच्या या अनोख्या अंपायरींगची दखल इंग्लंडचा फलंदाज मायकेल वॉन याने घेतली आहे. त्याने व्टिटरवरुन दिपकचा वॉईड बॉलचा निर्णय देतानाचा व्हिडीओ शेअर केला असून दिपक ला आंतरराष्ट्रीय अंपायर पॅनेल मध्ये पहायला आवडेल अशी प्रतिक्रिया देऊन दिपकच्या कलेचे एक प्रकारे कौतुक केले आहे.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचा भारतीय क्रिकेट खेळाडू

सचिन तेंडुलकरने देखील व्टिटरवर दिपकच्या या आगळ्या वेगळ्या अंपायरिंगची दखल घेतली असून सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय अंपायर बिली बाऊडन यांना उद्देशून यावर आपले मत काय आहे असा प्रश्न केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT