पंढरपूर : गणेशोत्सवाच्या निमित्ताने येथील टाकळी रोडचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा संगीत कारंजेचा देखावा उभारण्यात आला आहे. संगीत कारंजासाठी केलेली देखणी प्रकाशव्यवस्था, हिंदी मराठी चित्रपट गाण्यांचा लयबध्द ठेका आणि त्यावर थिरकणाऱ्या जलधारा पाहण्यासाठी महिला वर्गासह आबाल वृद्ध गणेशभक्तांची गर्दी होत आहे.
शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या संकल्पनेतून टाकळी रोडचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी आकर्षक असा संगीत कारंजे देखावा उभारला आहे. भव्य स्टेज, त्यामध्ये आकर्षक गणेश मुर्ती, विविध प्रकारच्या एलईडी लाईटचा वापर करुन तयार करण्यात आलेली रोषणाई आणि उडत्या चालीच्या गाण्यांच्या ठेक्यावर पाण्याचे रंगीबेरंगी तुषार उडवणारे संगीत कारंजे असा नयनरम्य देखावा या गणेश मंडळाने तयार केला आहे.
टाकळी गाव परिसरातील पंचक्रोशीसह पंढरपूर शहरातील गणेश भक्तांची देखील हे संगीत कारंजे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. सांगली येथील शरीफ मुजावर या कलाकाराने हे संगीत कारंजे उभारले असून अनंत चतुर्दशी पर्यंत या संगीत कारंजेचा मनमोहक नजारा गणेशभक्तांना अनुभवता येणार आहे. टाकळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय साठे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब घाडगे,
उपाध्यक्ष योगेश गायकवाड व सौरभ नागटिळक, सचिव नागेश कुंभार, खजिनदार सोमनाथ हिंगमिरे, सहसचिव नितीन खडतरे, कार्याध्यक्ष अविष्कार माने, ज्येष्ठ मार्गदर्शक माणिक सय्यद, सुरेश भोसले, माऊली देशमुख, भारत म्हेत्रे व मंडळाचे कार्यकर्ते समर्थ साठे, भोला शिंदे, अमोल अलकुंटे, शुभम माने, समर्थ गावडे, प्रवीण मायने, अनिकेत जगदाळे, विनायक वरपे, पंडित गायकवाड, लखन भोंडवे, प्रफुल्ल पाटील, सुरज जाधव आदी कार्यकर्त्यांनी हा देखावा उभारण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.