Traffic Police sakal media
सोलापूर

विसर्जन मिरवणुकीवेळी वाहतूक मार्गात बदल! ‘असे’ आहेत मिरवणूक अन्‌ पर्यायी मार्ग

शहरातील लोकमान्य गणेशोत्सव मंडळ, मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ, पूर्व भाग गणेशोत्सव मंडळ, लष्कर व विजापूर नाका, होटगी रोड, घरकुल, निलम नगर आणि बाळे मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ९ सप्टेंबरला विर्सजन मिरवणुका काढल्या जाणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील लोकमान्य गणेशोत्सव मंडळ, मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ, पूर्व भाग गणेशोत्सव मंडळ, लष्कर व विजापूर नाका, होटगी रोड, घरकुल, निलम नगर आणि बाळे मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ९ सप्टेंबरला विर्सजन मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्याअनुषंगाने एका दिवसासाठी शहरातील वाहतूक मार्गात मोठा बदल करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी काढले आहेत. मिरवणुका त्यादिवशी दुपारी चार वाजल्यापासून सुरु होतील. त्यामुळे मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गात बदल असेल.

गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकांचा मार्ग

१) ‘लोकमान्य’ मंडळाचा मिरवणूक मार्ग : पत्रा तालीम- सळई मारुती-गवंडी गल्ली-मल्लिकार्जुन मंदिर-बाळीवेस-तरटीनाका पोलिस चौकी-पांजरापोळ चौक-मेकॅनिक चौक-सरस्वती चौक-लकी चौक-आसार मैदान ते गणपती घाट.

२) मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा मार्ग : दत्त चौक-राजवाडे चौक-गंगा विहीर (नवी पेठ)-चौपाड-विठ्ठल मंदिर-बालाजी मंदिर-पंजाब तालिम-मल्लिकार्जुन मंदिर-बाळीवेस-चाटीगल्ली-मंगळवार पेठ पोलिस चौकी-मधला मारुती-माणिक चौक-कसबा पोलिस चौकी-खाटीक मशीद-हाजीमाई चौक ते गणपती घाट.

३) पूर्व विभाग गणेशोत्सव मंडळ : कन्ना चौक-जुनी जोडभावी पेठ पोलिस चौकी-वडलकोंड निवास-नेताजी नगर-भुलाभाई चौक-मार्कंडेय चौक-जोडबसवण्णा चौक-भद्रावती पेठ-सरकारी रूग्णालय-दत्त नगर-कुचन नगर-पद्मशाली चौक-जगदंबा चौक-जेलरोड पोलिस ठाण्यासमोरून किडवाई चौक-बेगम पेठ चौकी-पंचकट्टा-पठाण बागेसमोरून विष्णू घाट.

४) लष्कर विभाग गणेशोत्सव मंडळ : नळबाजार चौक-पेंढारी मशीद-मुर्गीनाला-सतनाम चौक-कुंभारगल्ली-मौलाली चौक-जगदंबा चौक-हुमा मेडिकल-सात रस्ता-शासकीय दुध डेअरी-पत्रकार भवनमार्गे धर्मवीर संभाजी तलाव.

५) विजापूर नाका मध्यवर्ती मंडळ : विजापूर नाका बसस्टॉप- आयटीआय पोलिस चौकी-जुना विजापूर नाका-धर्मवीर संभाजी तलाव.

६) होटगी रोड मध्यवर्ती मंडळ : महावीर चौक-बच्चुवार बंगला-पत्रकार भवनमार्गे धर्मवीर संभाजी तलाव.

७) घरकुल मध्यवर्ती मंडळ : पंचमुखी देवस्थान-वैष्णवी मारुती मंदिर चौक-संभाजी शिंदे हायस्कूलसमोरून पोषम्मा चौक-महालक्ष्मी चौक-सागर चौक-विजय मारूती चौक-नवनीत चौक-वळसा घेऊन गणेश मंदिर-बी ग्रूप-श्रीनेत्र चौकातून म्हाडा विहीर.

८) निलम नगर मध्यवर्ती मंडळ : दुर्गादेवी मंदिर-निलम नगर-सिद्धेश्वर चौक-माजी आमदार दिलीप माने संपर्क कार्यालयासमोरून मानाचा शिवगणेश मंदिर-करली चौक-बनशंकरी हॉटेल-पद्मा ट्रेडर्स-गवळी वस्ती-परळकर विहीर.

९) बाळे मध्यवर्ती मंडळ : बाळे परिसर.

लक्षात ठेवा, वाहतूक मार्गातील बदल

  • १) रेल्वे स्टेशन व एसटी स्टॅण्डकडे येणाऱ्या वाहनांसाठी विजयपूर नाका-आयटीआय पोलिस चौकी-निर्मिती विहार-सलगर वस्ती पोलिस ठाणे-मरिआई चौक-भैय्या चौक-रेल्वे स्टेशन तसेच भैय्या चौक ते निराळे वस्ती एसटी स्टॅण्ड असा पर्यायी मार्ग असणार आहे.

  • २) शहरातून ये-जा करणाऱ्या चारचाकी वाहनांना जुना पुना नाका, जुना तुळजापूर नाका, जुना बोरामणी नाका, अशोक चौकमार्गे शहरात येता येईल.

  • ३) विजयपूरहून पुणे व हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन विजापूर नाका येथून नवीन बायपासमार्गे देगाववरून सोलापूर विद्यापीठमार्गे पुढे.

  • ४) पुणे रोडकडून विजयपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन पुना नाका येथून नवीन बायपासमार्गे विजयपूर रोडकडे.

  • ५) हैदराबादहून पुणे-विजयपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन हैदराबाद नाका-जुना हैदराबाद नाका-मार्केट यार्ड-नवीन पुना नाका-नवीन केगाव बायपासमार्गे पुढे.

  • ६) बार्शी रोडवरील वाहनांसाठी बार्शी रोड टोल नाका येथून खेडमार्गे केगाव ब्रिज हा पर्यायी मार्ग राहील.

जड वाहतूक सकाळी दहानंतर बंद

गणेशविसर्जन मिरवणुकीवेळी (९ सप्टेंबर) जड मालवाहू वाहनांना सकाळी दहा वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवरून जाता येईल. त्यानंतर रात्री मिरवणूक संपेपर्यंत त्यांना शहरातील मार्गावरून ये-जा करता येणार नाही, असेही पोलिस आयुक्तांच्या आदेशात नमूद आहे. तरीपण, त्या दिवशी पोलिसांची वाहने, अत्यावश्यक वाहने (रुग्णवाहिका, दवाखान्यांची वाहने, अग्निशामक वाहने, फळे, भाजीपाला, दूध अशा नाशवंत पदार्थांची वाहने, आर्मी, नेव्ही, पॅरामिलिटरी फोर्सची वाहने, व्हीआयपी व संरक्षित व्यक्तींची वाहने) यांना शहरातून प्रवास करायला परवानगी असणार आहे. १० सप्टेंबरपासून सर्व वाहतुकीचे मार्ग पूर्ववत होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, 'या' ६५ नेत्यांच्या नावांचा समावेश

Maharashtra Vidhan Sabha: दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अन् दोन राष्ट्रीय पक्ष; महाराष्ट्रात जागा वाटपात कोणाचा फायदा? कोणाचं नुकसान?

Bhushan Pradhan & Anusha Dandekar : "दादा-वहिनी" भूषण-अनुषाच्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्स ; डेटिंगची रंगली चर्चा

Ulhasnagar News : कॉलेज, डॉक्टरांवर निवडणूक जनजागृतीची जबाबदारी; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महानगरपालिकेने कसली कंबर

Vikramgad Assembly Assembly Election 2024 : मोखाड्यात भाजप मध्ये इनकमिंग सुरू

SCROLL FOR NEXT