प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. कार्यक्रमावेळी प्रचंड गर्दी होते. इतकी गर्दी होते की कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना पोलिसांना लाठीचा मार द्यावा लागतो. काही हुल्लडबाजांमुळे इतर सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. गौतमीच्या कार्यक्रमातील गर्दी आवरताना पोलिसांना अनेकदा अशक्य होऊन जातं, हे माहीत असूनही तिच्या कार्यक्रमांना प्रचंड मागणी आहे.
गौतमी पाटीलला महाराष्ट्रभरातून कार्यक्रमाला बोलावलं जातं. गौतमीही आपल्या कार्यक्रमाचं नियोजन करत कार्यक्रमाला हजेरी लावते. काल पंढरपुरात गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळेही तिच्या कार्यक्रमात मोठी झुंबड उडाली अन् पोलिसांना कार्यक्रमावेळी जमलेल्या हुल्लडबाजांना लाठीचा प्रसाद द्यावा लागला.
पंढरपूरजवळील वेळापूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीच्या कार्यक्रमासाठी अख्खं वेळापूर हजर झालं होतं. वेळापूरच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील आणि तालुक्यातील अनेक लोक कार्यक्रमाला हजर झाले होते. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती.
लोकांना बसायलाही जागा नव्हती. पब्लिक स्टेजवर येऊ नये आणि स्टेजला कोणतीही हानी पोहोचू नये म्हणून स्टेजभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले होते. गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आणि सुरु झाल्यानंतर लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं जात होतं. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्वांनी आपआपल्या जागेवर शांतपणे बसले.
गौतमी पाटील स्टेजवर येताच एकच गोंधळ सुरू झाला. त्यानंतर गौतमीने गाण्यावर ठेका धरताच पब्लिकच्या शिट्ट्यांचा सुरू झाल्या. पब्लिकने एकच कल्ला केला. काही तरुणांनी तर गौतमीसोबत जागेवरच ठेका धरला. काही जण तर पुढे येण्यासाठी प्रयत्न करत होते.
कुणीही जागेवर बसलेलं नव्हतं. सर्वजण जागेवर उभे राहून डान्स करत होते. त्यामुळे कार्यक्रमादरम्यान एकच गोंधळ उडाला. माईकवरून लोकांना वारंवार शांत राहण्याचा सूचना दिल्या जात होत्या. पण लोक काही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी थेट लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली.
पोलिसांकडून आणि आयोजकांकडून शांत बसण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. मात्र तिकडे गोंधळ सुरूच होता. गडबड करू नका. फोटो बघून गुन्हे दाखल होतील. गडबड गोंधळ करू नका, असं आवाहन माईकवरून करण्यात येत होतं. पण तरुण काही ऐकायला तयार होत नव्हते. त्यांची हुल्लडबाजी सुरूच होती.
'तुम्हा बघून तोल माझा गेला. तुम्ही सावरायला गप्पकन आला…' हे गाणं सुरू झाल्यावर साइड कलाकारांनी डान्स सुरू करताच तरुणांनी अधिकच गोंधळ घालायला सुरवात केली. त्यामुळे पोलिसांनी प्रेक्षकांना चोप दिला. मात्र, तरीही लोक ऐकत नव्हते. त्यामुळे अखेर गोंधळ अधिकच वाढल्याने या कलाकारांनी कार्यक्रम बंद केला. त्यानंतरही प्रेक्षकांना शांततेचं आवाहन केलं जात होतं. पण प्रेक्षक काही ऐकायला तयार नव्हते. त्यांची हुल्लडबाजी सुरूच होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.