Generic Drugs 
सोलापूर

सोलापुरातील 2500 मेडिकल्समध्ये मिळतात जेनेरिक औषधे ! मात्र डॉक्‍टर सुचवतच नाहीत ही औषधे

अनुराग सुतकर

सोलापूर : रुग्णांचा उपचार खर्च वाचावा यासाठी जेनेरिक औषधांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पूर्वी काही दुकानांतच मिळत असलेली ही औषधे आता केमिस्ट असोसिएशनने पुढाकार घेऊन 2500 दुकानांत उपलब्ध करून दिली आहेत. या उपलब्धतेला केवळ डॉक्‍टरांची साथ मिळाली तर मेडिकल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमध्ये रुग्णांच्या उपचार खर्चात बचत होऊन रुग्णांना लाभ होण्याची संधी निर्माण झाली आहे. कोरोना रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी गेल्या वर्षी शहरातील ग्राहकांनी जेनेरिक औषधांची सर्वांत जास्त खरेदी केली. 

जेनेरिक औषधांबद्दल गैरसमज 
जेनेरिक आणि ब्रॅंडेड गोळ्यांमध्ये औषधांचा फॉर्म्यूला सारखाच असतो; परंतु ब्रॅंडेड औषधांची किंमत त्यावर होणाऱ्या प्रसिद्धी, जाहिरातबाजी, टॅक्‍स अशा विविध घटकांमुळे वाढते. औषधांच्या किमतीचा त्याच्या गुणधर्माशी किंवा प्रभावीपणाशी थेट संबंध नसतो. त्यामुळे जेनेरिक औषधे स्वस्त म्हणजे कमी प्रभावी हा गैरसमज काही नागरिकांमध्ये वारंवार पाहावयास मिळत आहे. जर एखादी ब्रॅंडेड पेनकिलर गोळी सुमारे 10-12 रुपये असल्यास त्याची जेनेरिक औषधाची गोळी सुमारे 3-4 रुपयांची असू शकते. साधारणपणे 30-70 टक्के किमतीत फरक आढळू शकतो. जेनेरिक औषधांसाठी जाहिरात, कर किंवा केमिस्टपर्यंत पोचवण्यासाठी लागणारा वाहतुकीचा खर्च नसल्याने ब्रॅंडेड औषधांच्या तुलनेत जेनेरिक औषधे स्वस्त असतात. परंतु डॉक्‍टरच जेनेरिक औषधे सुचवत नसल्याने रुग्णांना अधिकचे पैसे भरून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहेत. 

जेनेरिक औषध म्हणजे काय? 
मूळ औषध किंवा त्याचे नाव वापरून विविध कंपन्यांद्वारा गोळ्या, सिरप्स बनवली जातात. काही औषध कंपन्या त्यांचं ब्रॅंड नेम वापरून औषधं विकतात. ब्रॅंड नेम नसलेली पण औषधांचा सारखाच फॉर्म्युला वापरून बनवलेल्या गोळ्या, सिरप म्हणजे जेनेरिक औषध. 

शहरात प्रत्येक मेडिकलमध्ये जेनेरिक औषधे मिळतातच. आमच्या असोसिएशनच्या निगडित असणाऱ्या 2500 मेडिकल्समध्ये जेनेरिक औषधे मिळत आहेत. तसेच आम्ही प्रत्येकाला 60 टक्के इथिकल आणि 40 टक्के जेनेरिक औषधे त्यांच्या मेडिकलमध्ये असलीच पाहिजे, असे सांगितले आहे. 
- बसवराज मणुरे, 
अध्यक्ष, सोलापूर डिस्ट्रिक्‍ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन 

आम्हीही आमच्या मेडिकलमध्ये सर्व प्रकारची जेनेरिक औषधे उपलब्ध करून दिली आहेत. परंतु त्या ग्राहकाला जर डॉक्‍टरांनी सुचवलं असेल किंवा तशी प्रिस्क्रिप्शन असेल तरच आम्ही जेनेरिक औषधे देतो. परंतु आम्ही पाहतो, की दहा पेशंटमागे फक्त एक नाहीतर जास्तीत जास्त दोन ग्राहकांनाच डॉक्‍टर जेनेरिक औषधांसाठी प्रिस्क्रिप्शन देतात. 
- यासिर शेख, 
हुमा मेडिकल 

रुग्णहितासाठी प्रतिसाद देऊ 
केमिस्ट असोसिएशनने जेनेरिक औषधांच्या माध्यमातून रुग्णांचा उपचार खर्च कमी करण्याकरिता प्रयत्न केले आहेत. असोसिएशनने आम्हाला याबाबत लेखी पत्राद्वारे कळवल्यास आयएमए निश्‍चितपणे रुग्णांचा उपचार खर्च कमी करण्याच्या दृष्टीने असोसिएशनला सकारात्मक प्रतिसाद देता येईल. 
- डॉ. हरिश्‍चंद्र रायचूर, 
अध्यक्ष, आयएमए सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT