Former MLA Deepak Salunkhe-Patil: आजपर्यंत मी सांगेल ते तुम्ही ऐकत आलात. यापुढील काळात माझ्या शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही.
तुम्ही जी भूमिका ठरवतील तो निर्णय घेणार आहे. जे कार्यकर्त्यांच्या मनात आहे तेच माझ्याही मनात आहे. आगामी रणसंग्राम डोळ्यासमोर ठेवून कामाला लागावे असे आवाहन माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केले.
सांगोला येथे शुक्रवार (ता. २८) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता संवाद बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना साळुंखे-पाटील बोलत होते.
या बैठकीस चारुशीला काटकर, मधुमती साळुंखे, पंढरपूर तालुक्यातील समाधान काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, माजी उपनगराध्यक्ष शिवाजी बनकर, शिवाजी कोळेकर, आर. डी. पवार, शहाजी साळुंखे, अनिल नागटिळक, विलास देठे, राजाभाऊ माने, नवनाथ माने, सुनील पाटील, बापू जाधव, संतोष साळुंखे, डॉ. सुधाकर महारनवर, अनंता घालमे, पिनु जाधव, चंद्रकांत शिंदे, आलमगीर मुल्ला, अनिल खडतरे, सतीश काशीद, विजय राऊत, चंदन होनराव, राम बाबर, चंद्रकांत कारंडे, सुनील साळुंखे, विजय पवार, चंद्रकांत चौगुले, अनिल मोटे, दिलीप मोटे, महादेव कांबळे, संतोष पाटील, शोभाताई खटकाळे, सदाशिव साळुंखे, सखुताई वाघमारे, शुभांगी पाटील, किसन गायकवाड, योगेश खटकाळे, जयवंत नागने, वसंत जरे, संभाजी हरिहर, रामदादा मिसाळ, राजाराम घागरे, विश्वनाथ चव्हाण, बाबुराव नागने, हरी सरगर, अजित गोडसे, अमोल सुरवसे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार साळुंखे-पाटील म्हणाले, मी कायमच जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतो. आता खेडोपाड्यातील जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी लवकरच गावभेट दौरा आयोजित करत आहे. या दौऱ्यात सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून त्या समस्या गावातच सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शिवाय २५ जून ते २४ जुलै दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जास्तीत जास्त नवीन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे. विधानसभेची निवडणूक लढवण्याचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना उत्तर देताना ते म्हणाले, गेली 35 वर्ष मी जो आदेश देईल तो कोणताही प्रतिप्रश्न न करता प्रामाणिकपणे पाळणारे कार्यकर्ते हेच माझे राजकीय भांडवल आहेत या पुढील काळात कार्यकर्त्यांना मी कोणताही आदेश देणार नाही तर कार्यकर्ते जी भूमिका ठरवतील तो निर्णय घेणार आहे.
जे कार्यकर्त्यांच्या मनात आहे तेच माझ्याही मनात आहे. यावेळी समाधान काळे, शिवाजी बनकर, आर. डी. पवार, शिवाजी कोळेकर, चंद्रकांत चौगुले, महादेव कांबळे, संभाजी हरीहर, अक्षय चोरमुले, सखुबाई वाघमारे आधी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आबांनी विधानसभा लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह -
या कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साळुंखे पाटील (आबा) यांनी यावेळी विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला. आबा आता कुणाला पाठिंबा द्यायचा नाही, ज्यांना द्यायचा आहे त्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा. यावेळी आर या पारची लढाई लढाईची आहे असेही कार्यकर्त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.