सांगोला : सांगोला तालुक्यातील चार ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायती शेतकरी कामगार पक्षाने वर्चस्व मिळवले आहे तर आमदार शहाजी बापू पाटील यांनी फक्त आपली स्वतःची चिकमहुद ग्रामपंचायत मिळविण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारल्याचे चित्र निकालावरून दिसत आहे.
सांगोला तालुक्यामध्ये चिकमहूद, खवासपूर वाढेगाव व सावे या चार ग्रामपंचायतीची निवडणूक लागली होती. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी 83.37 टक्के चुरशीने मतदान झाले होते. महोद ग्रामपंचायत आमदार शहाजी बापू पाटील यांचे गाव आहे संपूर्ण जिल्ह्याचे या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लक्ष लागले होते ही ग्रामपंचायत आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपली सत्ता राखली असली तरी महूद ग्रामपंचायत सोडली तर इतर तीन ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाने आपली सत्ता खेचून आणली आहे.
महूद ग्रामपंचायत मध्ये एकूण 15 जागेपैकी निवडणुकीच्या दरम्यान एक उमेदवार मयत झाल्यामुळे 14 जागेची ग्रामपंचायत निवडणूक लागली होती. या 14 पैकी 13 जागा आमदार शहाजी बापूच्या गटाने जिंकले आहे तर एक जागा विरोधकांना मिळवण्यात यश आले आहे. सरपंचपदहे शहाजी बापू पाटील गटाने जिंकले आहे.
वाढेगाव ग्रामपंचायत ही माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांची सत्ता होती. या ग्रामपंचायत मध्ये शेतकरी कामगार पक्ष व मित्रपक्षाने बाजी मारली असून सरपंचसह 13 जागापैकी सात जागा जिंकल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादीची ग्रामपंचायत शेकापने स्वतःकडे खेचून आणली आहे.
सावे ग्रामपंचायत ही पारंपरिक शेकापचा गड मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या गावात शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. ती या वेळीही त्यांनी टिकवली आहे. आताही शेतकरी कामगार पक्षाच्या दोन गटांतच या ग्रामपंचायतीसाठी लढत झाली होती. असे असूनही सावे ग्रामपंचायतीमध्ये शेकापने बाजी मारली आहे.
खवासपूर ग्रामपंचायत मागील दोन पंचवार्षिकपासून आमदार पाटील गटाकडे होती. या निवडणुकीत मात्र शेकापने सरपंचपदासह १०-१ अशी सत्ता मिळविली आहे. खवासपूर ग्रामपंचायत ही आमदार पाटील यांच्या चिकमहूद या पंचायत समिती गणामध्ये येते. त्या ठिकाणी पाटील गटाला मोठ्या पराभावला सामोरे जावे लागले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या निवडलेल्या उमेदवारांचा यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख अभिनंदन करताना दिसून येत होते. विजयी शांततेत साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.