उत्तर सोलापूर : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा (Maharashtra Rajya Draksha Bagaitdar Sangh)नुकताच पंढरपूर येथे मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये द्राक्षाचे वाणानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. या दराच्या खाली शेतकऱ्यांनी आपली द्राक्ष (Grape)विकू नये. सगळ्याच क्षेत्रात एकी आहे त्याचप्रमाणे द्राक्ष बागायतदारांनी ही या माध्यमातून एकी दाखवण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे राज्याध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी केले.
द्राक्षाला ही हमीभाव मिळाला पाहिजे ही चळवळ यंदाच्या वर्षीपासून नाशिक विभागापासून सुरू झाली. त्यानंतर सांगली विभागाचाही मेळावा घेण्यात आला. त्या मेळाव्यामध्ये ही द्राक्षाचे दर निश्चित करण्यात आले. त्यानुसारच नुकताच पंढरपूर येथे ही सोलापूर विभागाचा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी सोलापूर विभागातील सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये चर्चा करून सर्वानुमते दहा टक्के इतका झालेल्या खर्चावर नफा ठेवून द्राक्षाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्या दरानेच शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने केले आहे.
यंदाच्या वर्षी पावसाने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. द्राक्षाचे उत्पादन घेण्यासाठी मागील वर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. त्या खर्चाचा हिशोब करूनच त्यावर केवळ दहा टक्के नफा ठेवून हे दर निश्चित करण्यात आले आहेत. बाजारामध्ये व्यापारी वाटेल त्या किमतीने शेतकऱ्यांकडून मालाची मागणी करतात. मात्र शेतकऱ्यांनी संघाने निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दराने द्राक्ष विकू नये अशी वज्रमुठ पंढरपूर येथील बैठकीत निश्चित करण्यात आली. पंढरपूर येथील बैठकीसाठी राज्याध्यक्ष शिवाजी पवार, माजी अध्यक्ष महेंद्र शाहीर, सोलापूर विभागाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, मानद सचिव गौस अहमद शेख यांच्यासह सोलापूर विभागातील द्राक्ष बागायतदार शेतकरी उपस्थित होते.(Solapur News)
वाणानुसार द्राक्षाचे निश्चित केलेले प्रति किलोचे दर
थाॅमसन-35
माणिकचमन/सोनाका-40
सुपर सोनाका-50
आर के, एस एस एन, आनुष्का-55
बेदाण्याचे प्रतवारी नुसार दर
एक नंबर 200
दोन नंबर 150
तीन नंबर 100
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.