मुख्यमंत्र्यांवर माझं खूप प्रेम! शिवसैनिकांच्या संतापानंतर भरणेंची प्रतिक्रिया Canva
सोलापूर

मुख्यमंत्र्यांवर माझं खूप प्रेम! शिवसैनिकांच्या संतापानंतर भरणेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांवर माझं खूप प्रेम! शिवसैनिकांच्या संतापानंतर भरणेंची प्रतिक्रिया

श्रीनिवास दुध्याल

पालकमंत्री भरणे म्हणाले, काही माध्यमांनी मुद्दामहून माझ्या वक्तव्याचा चुकीचा विपर्यास केला. तरी माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.

सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांनी सोलापुरात महापालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे (Anand Chandanshive) यांच्या प्रभागातील वृक्षारोपण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. या वक्तव्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात आक्रमक झाले. राज्यभरात होणाऱ्या निषेधामुळे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी खुलासा केला असून, माझ्या भाषणातील वक्तव्याचा काही माध्यमांनी विपर्यास केला आहे. आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे व महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेत आहेत. आमच्या सर्वांचे नेते आहेत. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांचं खूप चांगलं काम आहे. परंतु काही माध्यमांनी मुद्दामहून माझ्या वक्तव्याचा चुकीचा विपर्यास केला. तरी माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.

राज्यभरात होणाऱ्या निषेधाला उत्तर देताना पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूर महापालिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमास पालकमंत्री म्हणून मी स्वत: गेलो होतो. स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापुरात कार्यक्रम खूप असल्यामुळे रविवारी धावपळीत सर्व कार्यक्रम सुरू होते. मी पुढे जाऊन आनंद चंदनशिवे यांच्या प्रभागातील वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांच्या भाषणानंतर मी भाषणाला उठलो. मी भाषणाला उभा राहिल्यानंतर महापौर श्रीकांचना यन्नम या थोड्या उशिराने तेथे आल्या. त्या वेळी महापालिकेचे गटनेते व इतर नेते उपस्थित होते. त्यांना मी सांगितलं की, हा उपक्रम चांगला आहे. बाकीची कामं आहेतच मात्र या 42 एकरामध्ये चांगल्या प्रकारचा गार्डन प्रकल्प राबवला जात आहे. याचा उपयोग शहरवासीयांना सुटीमध्ये आनंद लुटण्यासाठी होईल. या उपक्रमास नगरोत्थान व इतर योजनेमधून किंवा डीपीडीसी माध्यमातून निधी देण्यासाठी प्रयत्न करूया.

यानंतर उशिरा आलेल्या महापौरांना मी सांगितलं की, गटनेते व इतर लोकांशी चर्चा केल्यानंतर आमचं ठरलंय की, या गार्डनसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून निधी द्यायचा आहे, तर तुम्ही महापालिकेकडून तसा प्रस्ताव ताबडतोब सादर करा. यावर महापौर म्हणाल्या, की आपण मुख्यमंत्र्यांकडून निधी घेऊ. त्यावर मी त्यांना गावरान भाषेत एवढंच म्हटलं, की मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या मरूद्या आपण नंतर त्यांच्याकडे मोठा निधी मागू. परंतु आपण आपल्या डीपीडीसीच्या माध्यमातून निधी मिळवण्यासाठी ताबडतोब प्रस्ताव द्या. आणि आपण त्यांना ताबडतोब एक कोटीचा निधी देऊ. या माझ्या वक्तव्याचा काही माध्यमांतून विपर्यास केला गेला. आदरणीय उद्धवजी ठाकरे हे आमचे व महाविकास आघाडीचे नेत आहेत. आमच्या सर्वांचे नेते आहेत. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांचं खूप चांगलं काम आहे. परंतु काही माध्यमांनी मुद्दामहून माझ्या वक्तव्याचा चुकीचा विपर्यास केला. तरी माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मला आदर आहे. काही ठिकाणी माझ्या भाषणाच्या व्हिडिओमधील काही भाग डिलिट केलं असेल, असं वाटतं, असेही पालकमंत्री भरणे शेवटी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT