सोलापूर - सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या सोलापूर-पुणे (हुतात्मा) एक्स्प्रेसमध्ये दररोज सकाळी साडेसातच्या सुमारास प्रवासी आणि तृतीयपंथीयांमध्ये पैसे मागण्यावरून वाद होत आहेत. त्याचबरोबर लहान मुलांचा देखील पैसे मागण्यासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या सर्व प्रकारांकडे रेल्वेतील सुरक्षेसाठी असलेल्या आरपीएफ आणि रेल्वे लोहमार्ग पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
हुतात्मा एक्स्प्रेसने दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र या प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये सर्वात जास्त त्रास तृतीयपंथीयांकडून होत असल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचं म्हणजे तृतीयपंथीयांचा त्रास गेल्या काही वर्षांपासून वाढत चालला आहे. सोलापूर ते पुणे हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये तृतीयपंथीय आणि लहान मुलांच्या भीक मागण्याच्या प्रकाराने प्रवासी हैराण झाले आहेत.
शहर व परिसरातील नागरिक तसेच पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी आदी ठिकाणी नोकरदार वर्ग हुतात्मा एक्स्प्रेने प्रवास करत असतात. सकाळी पुण्याला जाऊन सायंकाळी पुन्हा सोलापूरला येण्यासाठी सोलापूर- पुणे हुतात्मा एक्स्प्रेस सोयीची आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे नागरिक गरज असताना सुद्धा बाहेरगावी जात नव्हते. आता कुठे सर्वत्र सर्व काही सुरळीत चालू आहे. असे एकीकडे असताना, मागील काही दिवसांपासून रेल्वेतील प्रवाशांना भीक मागण्याच्या प्रकारातून सुटका मिळाली असे वाटत असतानाच, हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये तृतीयपंथीयांकडून लहान मुले, युवक व नागरिंकाकडून बळजबरीने पैसे वसूल करण्यात येत आहेत. सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये असा प्रकार खुलेआम सुरू असताना रेल्वेतील रेल्वे पोलिस आणि संबंधित सुरक्षा व्यवस्था काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तृतीयपंथीयांच्या त्रासातून सुटका होतोय ना होतो इतक्यात प्रवाशांसमोरून पैसे दिल्याशिवाय न हलणारी मुले सर्रास दिसून येत आहेत. रेल्वेतील अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
याबाबत सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गायकवाड म्हणाले, रेल्वे गाड्यांमध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. मात्र प्रवाशांना जर तृतीयपंथीयांकडून त्रास होत असेल तर प्रवाशांकडून तक्रारी येताच त्यांच्यावर कारवाइ केली जाइल.
ठळक बाबी....
धावत्या रेल्वेमध्ये तृतीयपंथी घुसून करतात जबरदस्तीने पैशाची मागणी
पैसे नाही दिले तर करतात अश्लील हावभाव
अनेकदा प्रवाशांना मारहाणीच्या घटना
प्रवाशांना विनाकारण मानसिक त्रास
अश्लील चाळ्यांमुळे महिला वर्गाला त्रास
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.