Weather News : तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान, प्रचंड उकाडा, दिवसभराच्या उन्हामुळे रात्री उशिरापर्यंत उष्ण झळा, यामुळे हैराण झालेल्या सोलापुरातील नागरिकांना ढगाळ वातावरणाने दिलासा दिला. सोलापुरात वाऱ्याचा वेग वाढल्याने अल्हाददायक वातावरण तयार झाले होते.
दिवसभर उन्हाचा चटका असल्याने अनेकजणांनी घराबाहेर पडणे टाळले होते. सायंकाळी ढगाळ वातावरण व वाऱ्याचा वेग वाढल्याने अनेकांनी घराबाहेर पडण्यास, मोकळ्या वातावरणात फिरण्यास प्राधान्य दिले. मे महिन्यात सोलापूरच्या तापमानात चढउतार बघायला मिळाला. मे महिन्याची सुरवात ४२ अंश सेल्सिअस तापमानाने झाली. त्यानंतर ३ व ४ मे रोजी तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअस पार झाला होता.
यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ५ मे रोजी झाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी ६ मे रोजी सोलापूरच्या तापमानाचा पारा ४४.१ अंश सेल्सिअस झाला होता. सोलापुरात सलग दोन दिवस तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअस पार झाला होता.
त्यानंतर सोलापूरच्या तापमानात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसले. ढगाळ वातावरण व वाऱ्याचा वेग वाढल्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली होती. सोलापुरात १० ते १५ मे या कालावधीत अवकाळी पाऊस हजेरी लावेल किंवा या कालावधीत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
या कालावधीत सोलापूरचे तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे सोलापुरातील नागरिकांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांमधील तापमान अंश सेल्सिअसमध्ये
ता. ९ मे ४२.२
ता. ८ मे ४१.६
ता. ७ मे ४२.२
ता. ६ मे ४४.१
ता. ५ मे ४४.४
ता. ४ मे ४३.४
ता. ३ मे ४३.२
ता. २ मे ४२.८
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.