horn 
सोलापूर

पुणे - सोलापूर महामार्गावर कर्णकर्कश हॉर्नही सुसाट

विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याची मागणी

जनार्दन दांडगे.

लोणी काळभोर: परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेचा विचार न करता अधिक क्षमतेचे कर्णकर्कश हॉर्न बसवून अनेक वाहनचालक पुणे-सोलापूर महामार्गाने सुसाट वेगाने वाहने चालवीत आहेत. या कर्णकर्कश आवाजामुळे शाळा, महाविद्यालय व दवाखाने, तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर सामान्य नागरिक व वाहनचालक त्रस्त आहेत. पोलिस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी पूर्व हवेलीत विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याची मागणी नागरीक करू लागले आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावरून कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीपासून ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यावर प्रवास करताना सुरू होणारा टप्पा प्रवाशांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे. या टप्प्यात रोजच कुठे ना कुठे वाहतूक कोंडीत अडकवण्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. या ठिकाणी प्रत्येक चौकात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अवजड वाहने, चारचाकी, दुचाकी, रिक्षा व वडाप यांच्या कर्णकर्कश हॉर्नने महामार्गाच्या शेजारी असलेल्या दुकानदारांचे व राहणाऱ्या नागरिकांना या वाहनचालकांचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.

पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला ५० टक्के शाळा, महाविद्यालये, दवाखाने आहेत. या ठिकाणी हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. मात्र, याची माहिती वाहनचालकांना नसावी, अशी स्थिती आहे. या सर्व ठिकाणांपासून कर्कश हॉर्न वाजवीत भरधाव जाणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिक करीत आहेत. या महामार्गावरून चालणाऱ्या सुसाट वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाचा नागरिकांना दररोज सामना करावा लागत आहे. कर्णकर्कश आवाजात दुचाकीचे सायलेन्सर, हॉर्न बसविणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर कारवाई होत नाही, यामुळे शांतता भंग पावत आहे. सुसाट धावणाऱ्या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे शांतता भंग पावत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

ध्वनिप्रदूषण सुरू असताना याकडे संबंधित विभाग कोणतीच कारवाई करत नाही. रस्त्याने धावणाऱ्या दुचाकी चारचाकी यांच्या अतिदाबाच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण होत आहे. याचे मानवी जीवनावर व पर्यावरणावर गंभीर परिणाम दिसून येत आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई पोलीस व संबंधित विभाग कधी करणार असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

दरम्यान, ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या लोकांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही रिकामटेकड्या मुलांनी त्यांच्या दुचाकीचे फॅन्सी सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न लावून लोकांचे जीवन जगणे असह्य केले आहे. दिवसा व रात्री ध्वनिप्रदूषणाची पातळी किती असावी हे पर्यावरण संरक्षण कायद्याने ठरवून दिले आहे, याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस मोटार वाहन कायद्यानुसार आर्थिक दंडाची तरतूद आहे. मात्र या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते.

वाहतूक पोलिसांचे तोंडावर बोट डोळ्यांवर पट्टी...

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हदीतील कवडीपाठ टोलनाका ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत काही रिकामटेकड्या मुलांनी त्यांच्या दुचाकीचे फॅन्सी सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्न लावून दुचाकीवर ट्रिपल सिट बसून लोकांचे जीवन जगणे असह्य केले आहे. अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या तुफान वाहने पळवनाऱ्या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस मोटार वाहन कायद्यानुसार आर्थिक दंडाची तरतूद आहे. पोलीस मात्र कारवाई न करता तोंडावर बोट डोळ्यांवर पट्टी बांधत तेरी भी चूप मेरी भी चूप करीत असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

Meesho: आता टी-शर्टवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो... मीशोवर नेटकऱ्यांचा संताप! कंपनीनं काय दिलं स्पष्टीकरण?

Kartiki Yatra : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार

अखेर भुलभुलैय्या 3 ने सिंघम अगेनला टाकलं मागे; बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कार्तिकच ठरला अजयपेक्षा सरस

Nashik Vidhan Sabha Election : बंडखोरांच्या तलवारी म्यान; बहुतांश बहुरंगी लढती

SCROLL FOR NEXT