माढा/उपळाई बुद्रूक : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट आणि सीए अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता. ११) जाहीर झाला, या अंतिम परीक्षेत उपळाई बुद्रूक (ता. माढा) येथील सुपुत्र आशिष अरविंद नकाते याने घवघवीत यश संपादन केले आहे.
अधिकाऱ्यांचे गाव म्हणून परिचित असलेल्या या गावातून पहिला ‘सीए’ होण्याचा बहुमान त्याने पटकाविला आहे. ‘सीए’ परीक्षेच्या अंतिम निकालात आशिषने यश संपादन केल्यानंतर उपळाई बुद्रूक येथे फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला.
आशिष नकाते याचे प्राथमिक शिक्षण उपळाईच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण नंदिकेश्वर विद्यालयात झाले होते. अकरावी बारावी सोलापूरातील दयानंद महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर बीकॉमचे शिक्षण पुण्यातून पूर्ण केले होते. आशिषची आई वंदना नकाते या जिल्हा परिषदेच्या शिक्षिका आहेत. तर वडील अरविंद नकाते हे माढा येथील न्यायालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
उपळाई तसे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून परिचित आहे. सगळ्यांचा कल हा एमपीएससी व यूपीएससीकडे आहे. परंतु आपल्या मुलाने यापेक्षा वेगळे काहीतरी करावे अशी आशिष च्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी आशिष ’सीए’ होण्याचे स्वप्न दाखविले. वडिलांनी दाखवलेले स्वप्नं उराशी बाळगून आशिषने पुणे तर कधी गावीच घरी राहून ’सीए’ चा अभ्यास करत होता.
दिवसभरातील जवळपास १४ ते १६ तास अभ्यास करत होता. परंतु दोन ते तीन वेळा त्याला अवघ्या काही गुणांमुळे अपयशास सामोरे जावे लागले होते. परंतु त्याने ’हार न मानता’ जिद्द व चिकाटीने सातत्याने प्रयत्न करत राहिला. अन्देशात सर्वात कठीण समजली सनदी लेखपाल (सीए) या परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन केले.
या काळात त्याला आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त स्वप्नील पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर गावातील आयएएस रोहिणी भाजीभाकरे, शिवप्रसाद नकाते, डॉ अश्विनी वाकडे, पोलिस उपायुक्त डॉ संदीप भाजीभाकरे यांच्यासह गावातील इतर अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले.
सीएचा पदवी संपादन करताना संयम महत्त्वाचा आहे. अपयशाने खचून न जाता सातत्याने परीक्षा देत राहणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि कष्टपूर्वक अभ्यासातून हे यश नक्की मिळतेच.
- आशिष नकाते, सीए परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.