सोलापूर : आयसीआयसीआयच्या रिटायरमेंट फंड योजनेने एकाचवेळी तरुण व निवृत्त होणाऱ्या व्यक्तीसाठी निवृत्ती योजनांमधून निवृत्ती रकमांचे आकर्षक प्लान उपलब्ध केले आहेत. आयसीआयसीआय प्रुड्नेशिअल रिटायरमेंट फंड योजनेतून चार प्रकारात गुंतवणुकीची सुविधा केली आहे.
यामध्ये प्युअर इक्विटी, प्युअर डेट, हायब्रीड व हायब्रीड कॉन्झव्हेटीव प्लान हे प्रकार आहेत. प्रत्येक वयोगटासाठी एसडब्ल्यूपीनुसार निवृती वेतनाप्रमाणे समांतर लाभ मिळण्याची सुविधा या प्लान मध्ये आहे. तसेच गुंतवणूकदारांना प्लानच्या कोणत्याही प्रकारात जाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
कमी कालावधी काम करुन नियोजनपूर्वक निवृत्ती
विभक्त कुटुंबात निवृत्ती वेतनाची वाढती गरज
बदलत्या शैलीमुळे वाढता महागाई दर
निवृत्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन
वयानुसार विविध नियोजन प्रकाराची उपलब्धता
एसडब्ल्यूपीने नियमित उत्पन्नाची खात्रीशीर सुविधा
पाच वर्षाचा लॉक ईन पिरेड
एखाद्या २५ वर्षीय तरुणाने १० हजार रुपये महिना प्रमाणे वयाच्या ५० वर्षापर्यंत २ कोटी ४५ लाख रुपयाची गुंतवणूक केली. त्यास वय ५० व्या वर्षापासून १ लाख २० हजार रुपये एसडब्ल्यूपी प्रती महिना मिळू शकेल. एखाद्या व्यक्तीने ५८ व्या वर्षी १० लाख रुपये एक रकमी गुंतवणूक केली. तर त्यास लगेचच ५ हजार रुपये महिना एसडब्ल्यूपी रक्कम प्रति महिना मिळेल.
२५ ते ४५ वर्ष वयोगट प्यूअर इक्विटी प्लान
५५-६० वर्षे वयोगट प्यूअर डेट प्लान
४५ ते ५५ वर्षे वयोगट हायब्रीड प्लान
५० ते ५५ वर्षे वयोगट हायब्रीड कॉन्झरव्हेटीव्ह प्लान
वर्ष २००५ नंतर निवृत्ती योजनांबद्दल सरकारी धोरणे बदलली आहेत. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचे निवृत्ती नियोजन करावे लागणार आहे. हे लक्षात घेऊन रिटायरमेंटफंड प्लान काम करतो आहे.
- गौरव पांदारकर, म्युचअल फंड वितरक, जानकी नगर, जुळे सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.