लस न घेणाऱ्यांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) नियंत्रणासाठी शहरात 100 टक्के लसीकरण (Vaccination) व्हावे या हेतूने प्रतिबंधित लसीचे (Covid-19 Vaccine) दोन्ही डोस घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तरीही, लस न घेणाऱ्यांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. लस न घेता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पाचशे रुपये तर दुकानदारांना 10 हजार ते 50 हजारापर्यंत दंड भरावा लागणार आहे. त्यासंदर्भातील नवे आदेश प्रभारी महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी नुकतेच काढले आहेत. (If you do not get the corona vaccine now you will have to pay a fine of five hundred to fifty thousand rupees)
लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रभारी महापालिका आयुक्तांनी शहरातील आठ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून नियोजन केले आहे. त्यासाठी विभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक (Police Inspector), वैद्यकीय अधिकारी (Medical Officers), मुख्य आरोग्य निरीक्षक (hief Health Inspectors), आरोग्य निरीक्षक (Health Inspector), वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक (Traffic Branch) यांचीही मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक झोनअंतर्गत लसीकरण केंद्रे कोणती असणार, याचेही त्यांनी ठोस नियोजन केले आहे. शहरातील पेट्रोल पंप Petrol Pump), रिक्षा, प्रवाशी वाहतूक, मोठे मॉल्स, बॅंका, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, वाईन शॉप, विडी कारखान्यांसह सर्व दुकानांमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश प्रभारी आयुक्त शंभरकर यांनी दिले आहेत. तसेच त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले की नाहीत, याची खात्री करावी आणि त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करावे, असेही त्यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे. जनजागृती, प्रबोधनानंतरही स्वत:च्या सुरक्षिततेसाठी लस न घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. त्यासाठी पोलिस प्रशासन व महापालिकेने समन्वयातून काम करावे, असेही शंभरकर यांनी आदेश दिले आहेत.
नव्या आदेशानुसार...
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड
ज्या दुकानात, मॉलमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नाही, त्यांना दहा हजारांचा दंड
वारंवार सांगूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानास 50 हजारांचा दंड होईल
खासगी वाहनात कोरोना नियमांचे पालन होत नसल्यास प्रत्येक प्रवाशास 500 रुपयांचा दंड
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बस तथा वाहनचालकास दहा हजारांचा दंड केला जाणार
शहरातील एक लाख व्यक्तींनी घेतली नाही लस
शहरातील 18 वर्षांवरील सहा लाख 40 हजार 503 व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेणे अपेक्षित आहे. आतापर्यंत त्यातील पाच लाख 40 हजार 478 व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी तीन लाख 16 हजार 29 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, शहरातील अजूनही एक लाख 25 व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यांना आता संपर्क करून 'हर घर दस्तक'च्या माध्यमातून लसीकरण केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.