Illegal business gambling sakal
सोलापूर

Solapur: ‘खाकी’ वर्दीच्या हुशारीचा डब्बलगेम; कारवाया दाखविण्याबरोबरच मटका तेजीत ठेवण्यास सहकार्य

‘खाकी’ वर्दीच्या हुशारीचा डब्बलगेम; गृह विभागाच्या कारवाईचे बालंट टाळण्यासाठी चलाखी

सकाळ वृत्तसेवा

- शिवाजी भोसले

सोलापूर : स्मार्ट सिटी सोलापूर फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत एज्युकेशन अन्‌ मेडिकल हबच्या ट्रॅकवर असताना या शहराची मटका जुगाराच्या सट्टेबाजारामुळे वाताहत होत आहे. एकीकडे मटक्यासारख्या अवैध धंद्याला ‘आतून’ सहकार्य करणाऱ्या ‘खाकी’ने दुसरीकडे मटक्याच्याविरोधात दणक्यात ‘मॅनेज’ कारवाया देखील केल्याचे पोलिस आयुक्तालयाकडील माहितीवरून स्पष्ट होते.

स्वत:चे उखळ पांढरे करून घेताना मटका तेजीत चालण्यासाठी सहकार्य करायचे अन्‌ दुसऱ्या बाजूला राज्याच्या गृह विभागाकडून किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाया न करण्याचे प्रकरण शेकू नये, यासाठी मटक्याविरोधात कारवायादेखील करायच्या, अशी अक्कलहुशारीची ‘खाकी’वर्दीची सोलापुरात डब्बलगेम दिसते.

जुगारासंदर्भात पोलिस आयुक्तालयाकडून ‘सकाळ’ला जी माहिती मिळाली, त्यावरुन मटक्याबाबत तेजीतील धंदा आणि तुलनेत तीव्र कारवाया हेच चित्र स्पष्ट होते. २०२१, २०२२ आणि २०२३ या तीन वर्षात शहरात ज्याप्रकारे मटक्याचा धंदा बोकाळला त्या तुलनेत गुन्हेदेखील दाखल केल्याचा आलेख दिसतो.

२०२१ला जुगाराचे २३५ गुन्हे दाखल झाले होते. तुलनेत २०२२ ला ५९२ गुन्हे दाखल झाले तर २०२३ मध्ये अवघ्या सात महिन्यात ४७९ गुन्हे नोंदले गेले आहेत. तीन वर्षाची सरासरी पाहता गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणे तुलनेने दुप्पट-तिपट्ट असल्याचा दावा पोलिसांचा आहे.

अपवाद कामाठींचा...

सुनील कामाठींवर मटक्यासंबंधी कारवाई झाली. त्यावेळेस महाविकास आघाडी सत्तेत होती. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपची व आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रतिमा डागाळण्यासाठीच काँग्रेसच्या नेत्यांनी दबाव आणून सुनील कामाठींवर कारवाई करायला लावली आहे, असे आजही बोलले जाते.

म्हणजे राजकीय दबावामुळेच सोलापूर पोलिसांनी स्थानिक मटका किंगवर थेट कारवाई केली असल्याचे दिसून येते. एरवी पोलिस फक्त मटका बुकींवरच कारवाई करण्यात धन्यता मानत, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

आकडे बोलतात...

  • पोलिस ठाणे -२०२१ -२०२२ -२०२३

  • फौजदार चावडी - २९ -८१ -७२

  • जेलरोड -४७ -१०१ -७१

  • एमआयडीसी -४५ -१००-९५

  • जोडभावी -३६ -६७ -८४

  • सदर बझार -४९ -१४०- १०४

  • विजापूर नाका -२१ -९६ -७५

  • सलगरवस्ती -०८ -०७ -०८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT