goun khanij 
सोलापूर

मंद्रूप परिसरात होतोय भरदिवसा बेकायदा मुरूम उपसा ! महसूल विभागाचे मात्र "अर्थ'पूर्ण दुर्लक्ष 

श्याम जोशी

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) परिसरात दररोज बेकायदा आणि बेसुमार मुरूम उपसा चालू असून, महसूल विभागाचे याकडे जाणूनबुजून अर्थात "अर्थ'पूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांतून सुरू आहे. 

सध्या मंद्रूप परिसरात ठिकठिकाणी रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या रस्त्यांच्या कामासाठी लागणारा मुरूम मंद्रूप परिसरातील शेतातून राजरोसपणे अवैध पद्धतीने रॉयल्टी न भरताच उचलला जात आहे. बेकायदा मुरूम उपसा होत असताना मंद्रूपच्या महसूल विभागासह अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

मध्यंतरी अवैधरीतीने मुरूम उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी मंद्रूपच्या कोतवालाकडून जागेवर जाऊन टिप्पर व चैन जेसीबी पकडला. परंतु मुरुमाने भरलेला टिप्पर वाटेतच चालकाने बंद पाडला व गायब केला. रिकामा टिप्पर मात्र तहसील कार्यालयात आणून लावण्यात आला. काही दिवसांनी हा टिप्परही सोयीस्कररीत्या गायब झाला. त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्या टिप्परचा अजून शोध लागलेला नाही. पोलिसांतही कुठलीच तक्रार दाखल नाही. बेकायदा मुरूम उपसा करणाऱ्या लोकांना महसूल विभागाचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे. 

मंद्रूपमधे अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यापासून व तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांनी पदभार स्वीकारल्यापासून हा विभाग वादग्रस्तच ठरत आहे. याबाबत सरपंचांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार करून बदलीची मागणी केली होती. परंतु, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक ! सामान्य शेतकऱ्यांना हकनाक त्रास देऊन मुरूम उपसा करणाऱ्या महाचोरांना अभय देण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे. 

चोर सोडून संन्यासाला फाशी असाच प्रकार येथे आहे. एकंदर, मंद्रूप परिसरात बेकायदा आणि बेसुमार मुरूम उपसा चालू असल्याने मनमानी करून मुरूम महाचोरांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याचे काम महसूल विभागाकडून होत आहे. याबाबत कोणी तक्रार केल्यास तक्रारदारास अडचणीत आणले जात आहे. कंदलगाव येथील एका युवकावर अशीच पोलिसांत तक्रार दाखल करून त्यास कारावासाची हवा दाखवली आहे. महसूल विभागात महिला अधिकारी असल्यामुळे लोक तक्रार करण्यास धजावत नाहीत. 

विजयपूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी लागणारा मुरूम काही ठिकाणाहून रॉयल्टी न भरताच उचलला जात आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडवला जात असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकारीही याकडे लक्ष देत नसल्याने साखळी भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त होत आहे. गौण खनिज विभागाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात मुरूम उचलला गेला आहे. अवैध मुरूम उचललेल्या जागेचे मोजमाप घेऊन त्याचा वापर करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करून दंड वसूल करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. 

ज्या गावात मुरूम उपसा सुरू आहे, तेथील वस्तुस्थितीचा अहवाल मंडल अधिकाऱ्यांकडून मागवला आहे. जेथे उपसा सुरू आहे तेथील रॉयल्टी शासनाकडे जमा आहे. अहवाल आल्यानंतरच त्याबाबत सविस्तर सांगता येईल. सध्या अवैध मुरूम उपसा वगैरेबाबत काही पत्रकारांनी योग्य शहानिशा न करता बातम्यांचा सपाटा लावला आहे. बहुतांश पत्रकारच "अर्थ'पूर्ण काम करत आहेत. 
- उज्ज्वला सोरटे, 
अप्पर तहसीलदार, मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) तहसील कार्यालय 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT