imd monsoon 4 days rainfall in pandharpur agriculture farming solapur sakal
सोलापूर

Solapur Rain News : पंढरपुरात पावसाची चौथ्या दिवशीही हजेरी; ११२ मिलिमीटर पावसाची नोंद

अजूनही पेरणीयोग्य पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या रखडलेल्याच

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता कुठे बरसू लागला आहे. मागील तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे. आज (शनिवारी) सलग चौथ्या दिवशी पंढरपूर शहर व तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

शुक्रवारी एकाच दिवसात तालुक्यात ११२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विहिरी आणि बोअरवेलची पाणी पातळी कमालीची खाली गेली आहे.

त्यामुळे शेती पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. राज्यात सर्वत्र धो-धो पाऊस सुरू असला तरी सोलापूर जिल्हा मात्र अद्यापही कोरडाच आहे. जिल्ह्यात म्हणावा तितका पाऊस नसल्याने अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

उजनी धरणातील पाणीसाठाही मायनसमध्ये गेल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. अशातच आता मागील काही दिवसांपासून अनेक भागात कमी- अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे.

शुक्रवारी (ता. २१) सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरवात झाली. दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूर व परिसरात सुमारे पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले.

शनिवारी (ता. २२) मात्र हलकासा पाऊस झाला. सलग चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे करपू लागलेल्या ऊस पिकासह फळबागांना जीवदान मिळाले आहे. अजूनही पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. शेतकरी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

शुक्रवारी ११२ मिलिमीटर पाऊस

पंढरपूर तालुक्यात सरासरी १२.४४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी एका दिवसात ११२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. सर्वाधिक पंढरपूर व कासेगाव मंडळामध्ये २१ मिलिमीटर इतका पाऊस झाला तर भाळवणी मंडळामध्ये पाऊस झाला नाही. तालुक्यातील एकूण नऊ मंडळांमध्ये शुक्रवारी एकाच दिवसात ११२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

मंडळनिहाय शुक्रवारपर्यंत झालेला पाऊस

करकंब (१० मिलिमीटर), पटवर्धन कुरोली (१३ मिलिमीटर), भंडीशेगाव (१५ मिलिमीटर), भाळवणी (००), कासेगाव (२१ मिलिमीटर), पंढरपूर (२१ मिलिमीटर), तुंगत (११ मिलिमीटर), चळे (१२ मिलिमीटर), पुळूज (९ मिलिमीटर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT