'ओ शेठ, तुमच्या चार पिढ्या बसून खातील!' बार्शीत राजकारण, प्रशासन अन्‌ नागरिकांचा कलगीतुरा  Canva
सोलापूर

'ओ शेठ, तुमच्या चार पिढ्या बसून खातील!' बार्शीत कलगीतुरा

'ओ शेठ, तुमच्या चार पिढ्या बसून खातील!' बार्शीत राजकारण, प्रशासन अन्‌ नागरिकांचा कलगीतुरा

प्रशांत काळे

गणेशोत्सव सुरू झाला अन्‌ गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत बार्शी शहरातील राजकारण, प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला.

बार्शी (सोलापूर) : गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) सुरू झाला अन्‌ गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत बार्शी (Barshi City) शहरातील राजकारण (Politics), प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. दोन कोरोनाच्या (Covid-19) लाटा येऊन गेल्यानंतर तिसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवली जात असतानाच शासन धोरणानुसार सर्व व्यापार, व्यवसाय सुरू झाले. पण बार्शी बंदचा निर्णय व्यापाऱ्यांनी ऐन सणासुदीत घेतल्याने वातावरण ढवळून निघाले तर आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) अन्‌ पोलिस निरीक्षक यांच्यात झालेल्या चर्चेमुळे त्यात आणखी रंग भरला.

इंग्रज राजवटीपासून बार्शीच्या बाजारपेठेची ओळख. येथील तूरदाळ देशात विक्री होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मोठी बाजारपेठ येथे आहे. चिंच, ज्वारी, हरभरा आदी शेतमाल राज्यासह इतर राज्यात येथून पाठवला जातो. पिढ्यान्‌पिढ्या येथे व्यापाराची परंपरा आहे. मोठ्या प्रमाणात ठोक अन्‌ किरकोळ बाजारपेठ असल्याने आसपासच्या पाच ते दहा तालुक्‍यातील नागरिक, छोटे दुकानदार खरेदीसाठी येतात आणि सणासुदीच्या काळात मोठी गर्दी होते. त्यातून वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. महिन्यापूर्वी आलेले पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पाऊल उचलले आणि व्यापाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या. आम्ही व्यवसाय कसा करायचा, ग्राहक दुकानांसमोर वाहने लावणार, पार्किंगची व्यवस्था नाही, व्यवसाय होत नाही, रोज वाहनांना पोलिसांचा दंड, वाहने येणे बंद झाले अन्‌ विषय गेला लोकप्रतिनिधींच्या कानावर व पोलिस प्रशासनाविरोधात बार्शी बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. पोलिस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांनी मध्यस्थी करीत व्यापारी, लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या. पण व्यापाऱ्यांच्या भावना काही जण वगळता व्यापाऱ्यांऐवजी इतरांनीच कथन केल्या. एका व्यापाऱ्याने तर बंद चुकीचा असल्याचे सांगितले.

दोन लॉकडाउनच्या काळात बिस्किट पुड्यांपासून किराणा माल, तेल, डाळी, शेंगदाणे, भाजीपाला, कांदे, बटाटेसह कशी चढ्या दराने विक्री केली, गुटखा, तंबाखूचा चौपट किमतीने व्यवसाय केला. ही बाब अनेक सामान्य नागरिक खासगीत बोलून दाखवत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना पोलिस शिस्त लावत आहेत तर त्यांनी लावून घेतलीच पाहिजे, असे सामान्य नागरिक बोलत आहेत.

आमदार राजेंद राऊत यांनी सावध भूमिका घेत आगामी नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कायदा व माणुसकीचा समन्वय साधा, निर्णय घेण्यास प्रशासन मोकळे आहे. टप्प्याटप्प्याने निर्णय घ्या. आवक-जावक होण्यावर दुष्परिणाम होणार नाहीत याची काळजी घ्यावी, मी लोकप्रतिनिधी असल्याने मला लक्ष घालावे लागणार असून माझी जबाबदारी आहे. प्रशासन अन्‌ नागरिक यांच्यामधील मी दुवा आहे, असे स्पष्ट केले. मागील बारा वर्षापूर्वी हा प्रश्न निर्माण झाला होता. पण याबाबत राजकारण केले जाते. अतिक्रमण काढले की मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांना दोष दिला जाणार. अधिकार क्षेत्राची मला जाणीव असून शेळके-आमदार यांच्यात वाद झाला यात काहीं तथ्य नाही. मला अडचणी सांगण्यासाठी वरिष्ठांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सांगू शकतो, असेही यावेळी आमदार राऊत सांगायला विसरले नाहीत.

ओ शेठ, तुमच्या चार पिढ्या बसून खातील...

ओ शेठ, तुम्ही 50 वर्षे दुकान बंद ठेवले तरी तुमच्या चार पिढ्या बसून खातील. सर्वसामान्य व्यापारी कोरोनामुळे मरून गेला आहे, तुमचा बंद तुमच्या पुरता मर्यादित ठेवा, असं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजला प्रतिसादही मिळाला अन्‌ बरंच काही सांगून गेला. अखेर बैठकीत बंद रद्द होऊन व्यापारी अन्‌ प्रशासन यांच्यात त्या-त्या भागातील प्रश्न सोडविण्यात येतील आणि पंधरा दिवसांत निर्णय घेऊ यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

हे काय वागणं आहे... Bigg Boss 18 मधील 'या' स्पर्धकावर भडकली रुपाली भोसले; सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करत म्हणाली-

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

SCROLL FOR NEXT