सोलापूर

अनोळखी व्यक्तीसाठी बेगमपुरातील मित्रांनी घडविले माणुसकीचे दर्शन

अशपाक बागवान

बेगमपूर (सोलापूर) : सायंकाळची वेळ...महामार्गावर तुरळक वाहतूक व पाय मोकळे करण्यासाठी काही नागरिक फिरायला आले होते. याचवेळी भुकेने व्याकूळ, अशक्तपणा व अल्प आजारामुळे रस्त्याच्याकडेला निपचित अवस्थेत एक अनोळखी व्यक्ती विव्हळत पडलेली होती. यावेळी फिरायला आलेल्या चौघा मित्रांचे तातडीने वैद्यकीय उपचारासाठी केलेले प्रयत्न आणि १०८ रुग्णवाहिकेची सेवा. हे सर्व माणुसकीचे दर्शन घडविणारा तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरलेला व त्या अनोळखी व्यक्तीवर तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्याचा प्रसंग बेगमपूर (ता.मोहोळ) येथे अनुभवास मिळाला. (in begumpur, some young friends helped a stranger on the street)

घडलेला प्रसंग असा, गावातील काहीजण रोज सायंकाळी इंचगाव किंवा माचनूरच्या दिशेने नित्यनियमाने फिरण्यासाठी (वाकिंग) जातात. रविवारी सायंकाळच्या सुमारास गावातील इरफान बागवान, मोहसीन पठाण, अहमद शेख व शकील शेख हे युवा मित्र नेहमीप्रमाणे गावाकडून इंचगावकडे फिरायला (वाकिंग) गेले होते. दरम्यान गावापासून दोन अडीच किलोमीटरच्या अंतरावर बबन जगताप यांच्या शेताजवळ व महामार्ग रस्त्याच्या बाजूलाच एक अनोळखी व्यक्ती विव्हळत असलेली नजरेस पडली. त्याने अंगावर प्लास्टिक कापड पांघरले होते. या युवकांनी जवळ जावून पाहिले व अधिक चौकशी केली असता सदर व्यक्तीचे नाव अरुण दामाजी (वय५८) व सुनिलनगर सोलापूर येथील रहिवासी असल्याचे व सांगोला येथे रोजनदारीवर काम करीत असल्याचे समजले.

सध्या काम बंद असल्याने व सोलापूरला जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने ते सांगोला येथून पायी चालत निघाले होते. दरम्यान अतिसारचा त्रास होऊन त्यांची प्रकृती बिघडली व मागील दोन ते तीन दिवसापासून याच ठिकाणी अशक्तपणामुळे निपचित अवस्थेत रस्ताच्या कडेला विव्हळत पडले असल्याचे त्यांना समजले. या अवस्थेत सदर व्यक्तीस सोडून जाणे योग्य नाही असा विचार करीत या युवकांनी १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला व सदर अनोळखी व्यक्तीबाबत महिती दिली. संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी पाटकूल (ता.मोहोळ) हून वाहनासह तातडीने घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत गावातील उमाकांत कावळे, सुभाष सपाटे, आरिफ पठाण, लखन माने, नितीन आमले, अमर भोसकर, सोमनाथ सपाटे आदीसह अन्य युवकही या ठिकाणी एकत्रित आले होते.

रुग्णवाहिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर इसमाची तपासणी केली. पुढील योग्य उपचारासाठी तात्काळ सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. कायदेशीर बाबी पूर्ण करून सदर इसमावर उपचारही सुरु करण्यात आल्याचे १०८ रुग्णवाहिका पथकाने सांगितले. सध्याच्या कोरोना परिस्थितीत वेळ, काळ याची पर्वा न करता रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी शासनाची तत्पर सेवा देणारी पाटकूलहून आलेली १०८ रुग्णवाहिका व बेगमपुरातील इरफान बागवान, मोहसिन पठाण, अहमद शेख व शकील शेख या युवकांनी परिस्थितीचे भान ठेवत माणुसकीच्या नात्याने एका अनोळखी व्यक्तीसाठी दाखविलेली कार्य तत्परता नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे.

अनेकदा रस्त्यावर घडलेल्या एखादया प्रसंगाची नागरिक १०८ला माहिती देतात व लगेच तेथून निघून जातात, अनेकदा पुढे सहकार्यच मिळत नाही. परंतु बेगमपुरातील युवकांनी केवळ माहिती न देता सदर व्यक्तीला रुग्णालयाकडे घेऊन जाईपर्यंत सहकार्य केल्याचे, १०८ रुग्णवाहिका पथकाने सांगितले. (in begumpur, some young friends helped a stranger on the street)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT