पोलिसांनी 97 वाहने जप्त केली आहेत. 15 आस्थापने सील केली असून अनावश्यक फिरणाऱ्या 18 जणांविरुद्ध कारवाई केली आहे. अकलूज पोलिस ठाण्याअंतर्गत क्षेत्रात सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
माळीनगर (सोलापूर) : माळशिरस तालुक्यात कोरोनाचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना प्रशासनाने चांगलीच पोलिसी खाक्या दाखवली आहेत. त्याअंतर्गत सहा हजार 593 व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून 26 लाख 53 हजार 750 रुपयांचा दंड वसूल केला आहे. (In Malshiras, a fine of Rs 26 lakh has been levied on those who break the rules of corona)
तालुक्यात अकलूज, माळशिरस, नातेपुते, वेळापूर अशी चार पोलिस ठाणे आहेत. त्यामध्ये आठ पोलिस अधिकारी व 208 कर्मचारी कार्यरत आहेत. चालू वर्षात 1 जानेवारीपासून 20 मेपर्यंत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये विनामास्क फिरणारे चार हजार 612, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे 627, सोशल डिस्टनसिंग न पाळणारे एक हजार 49, पाच पेक्षा जास्त गर्दी करणारी आस्थापने 20, वेळेनंतर सुरू असणारी आस्थापने कारवाई 36, नियम 69 प्रमाणे 82, नियम 188 प्रमाणे 36 जणांवर कारवाईचा समावेश आहे. पोलिसांनी 97 वाहने जप्त केली आहेत. 15 आस्थापने सील केली असून अनावश्यक फिरणाऱ्या 18 जणांविरुद्ध कारवाई केली आहे. अकलूज पोलिस ठाण्याअंतर्गत क्षेत्रात सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
लॉकडाउनचे उल्लंघन करणारे पोलिस प्रशासनास फसवत नसून स्वतः व त्यांच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालत आहेत. सर्वांनी स्वतःवर बंधने ठेवून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. इतके इशारे देऊनही नियम मोडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. खेडेगावातील ग्राम समितीने योग्य प्रकारे नियोजन केल्यास या साथरोगाचे नियंत्रण शक्य आहे.
- नीरज राजगुरू, उपविभागीय पोलिस अधिकारी, अकलूज
माळशिरस तालुक्यात पोलिसांनी केलेली दंडवसुली
पोलिस ठाणे वसूल दंड (रुपये)
अकलूज 10 लाख 5 हजार 900
माळशिरस 7.5 लाख 4 हजार 550
नातेपुते 6 लाख 48 हजार 200
वेळापूर 2 लाख 45 हजार 100
एकूण 26 लाख 53 हजार 750
(In Malshiras, a fine of Rs 26 lakh has been levied on those who break the rules of corona)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.