जिल्ह्यातील मोजक्या तालुक्यांत राहिलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला गटबाजीची डोकेदुखी वारंवार होऊ लागली आहे.
सोलापूर : जिल्ह्यातील मोजक्या तालुक्यांत राहिलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) गटबाजीची डोकेदुखी वारंवार होऊ लागली आहे. माळशिरस (Malshiras) आणि पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील गटबाजीचा विषय थेट प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांच्यापर्यंत गेला आहे. या दोन्ही तालुक्यांत नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये गटबाजीची धुसफूस वारंवार होताना दिसत आहे. माळशिरस राष्ट्रवादीमध्ये काही बदल केले आहेत. पंढरपुराच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (In Pandharpur and Malshiras, factionalism within the NCP is coming to the fore-ssd73)
2014-2019 या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी विरोधी बाकावर बसली. त्यामुळे पक्ष संघटनेतील पदांना फारसे महत्त्व नव्हते. जे पद पूर्वी अनेकांना नको होते त्या पदासाठी आता रुसवे-फुगवे सुरू झाले आहेत. 2019 मध्ये अनपेक्षितपणे राष्ट्रवादीला राज्यात सत्तेची संधी मिळाली आहे. राज्यात मुख्यमंत्री जरी शिवसेनेचे (Shivsena) असले तरीही सत्तेत होल्ड मात्र राष्ट्रवादीचाच असल्याने सध्या अनेकांना राष्ट्रवादीचे आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे पक्षातील पदे मिळविण्यासाठी आता मोठी स्पर्धा होऊ लागली आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पदे कमी आणि इच्छुक जास्त अशी स्थिती उद्भवली आहे.
माळशिरस राष्ट्रवादीतील वाद विकोपाला गेल्यानंतर या तालुक्यातील पक्षाची सूत्रे आता उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्या हातात बऱ्यापैकी आली आहेत. नव्या विरुद्ध जुन्यांचा संघर्ष या तालुक्यातील राष्ट्रवादीत समोर येऊ लागला आहे. पंढरपूर तालुक्यातील गटबाजीचा फटका राष्ट्रवादीला बसू लागला आहे. या तालुक्यातील गटबाजी कशी मिटणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. मोहोळ तालुक्यातही नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या गटबाजीची झलक प्रदेश राष्ट्रवादीला वारंवार दिसत आहे.
सूत्रे विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या हाती
सोलापूर शहर राष्ट्रवादीत नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होऊ लागला आहे. शहर राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते एकीकडे आणि युवा नेते एकीकडे अशीच स्थिती आहे. शहरातील राष्ट्रवादीची सूत्रे बऱ्यापैकी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या हातात आली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कशी कामगिरी करणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.