MLA Padalkar Esakal
सोलापूर

"या' कारणामुळे पोलिसांनी दाखल केला आमदार पडळकरांविरुद्ध गुन्हा !

"या' कारणामुळे पोलिसांनी दाखल केला आमदार पडळकरांविरुद्ध गुन्हा !

श्रीनिवास दुध्याल

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकप्रकरणी गुरुवारी जोडभावी पेठ पोलिस स्टेशनमध्ये दोघा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी बुधवारी टीका केली होती. त्याचे पर्यावसान त्यांच्याविरुद्ध अनेकांनी सोशल मीडियातून राग व्यक्‍त केला. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यावरून आमदार पडळकर हे घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आले होते. रात्री आठच्या सुमारास ते जोडभावी पेठ पोलिस ठाणे परिसरातील मड्डी वस्तीतील एसबीआय कॉलनीसमोरून जाताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगड फेकला. या प्रकरणी गुरुवारी जोडभावी पेठ पोलिस स्टेशनमध्ये दोघा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय कणके (वय 42, रा. भवानी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, जोडभावी पेठ पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. (In Solapur, police have registered a case against MLA Gopichand Padalkar)

कॉंग्रेसच्या "एकला चलो रे'च्या भूमिकेवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अन्य काही नेत्यांनी तिसऱ्या आघाडीसाठी दिल्लीतील काही नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा असल्याबद्दल पत्रकारांनी पडळकरांना विचारले. त्यावर पडळकरांनी "रात्र गेली हिशेबात अन्‌ पोरगं नाही नशिबात' अशी टीका केली. तसेच शरद पवार हे भावी पंतप्रधान असे मी लहानपणापासून ऐकत आलो असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. शरद पवार यांना मी मोठे मानत नसून राष्ट्रवादी ही साडेतीन जिल्ह्यांपुरतीची पार्टी आहे, अशीही टीका त्यांनी या वेळी केली होती. यानंतर पडळकर हे सोलापुरात भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी चहापाण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या कारमधून (एमएच 10- डीएन 0007) जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखींपैकी मागे बसलेल्या तरुणाने पडळकरांच्या गाडीवर दगड फेकला. कारची काच फोडून 25 हजार रुपयांचे नुकसान केले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी दोघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार पडळकरांसह कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल

दरम्यान, सोलापुरातील भवानी पेठ परिसरातील अक्कमहादेवी मंदिर, स्टेट बॅंक कॉलनी येथे झालेल्या घोंगडी बैठकीत कोरोना नियमांचे पालन करता गर्दी जमवली, सोशल डिस्टन्सिंग न ठेवता लोकांच्या जीवितेला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याचा गुन्हा आमदार पडळकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आयोजक संजय कणके, प्रकाश कारंडे, संजय पुजारी, राजू बंडगर, संतोष कारंडे, प्रकाश आनंदकर, रवी हाक्के, सचिन पाटील, समर्थ माशाळकर, अजय रूपनर, शरणू हांडे, परदेशी, बिपिन पाटील व इतर दहा ते पंधरा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT