Motivational Story of ad. Ganesh Pawar sakal
सोलापूर

Motivational Story: प्रेरणादायी! पानटपरी चालवून वकिलीचे शिक्षण घेतलेल्या गणेशची जिल्हा न्यायाधीशपदाला गवसणी

Motivational Story: पानटपरी चालविणाऱ्या वडिलांना मदत करून जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या बळावर ॲड. गणेश पवार यांनी जिल्हा न्यायाधीशपदाला गवसणी घातली. न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा बळकट आधारस्तंभ आहे. या क्षेत्रात हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या खूप संधी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

तात्या लांडगे

Motivational Story: दररोज दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या आणि वकील व न्यायाधीशांची रिक्तपदी, यात मोठी तफावत आहे. या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींना न्यायिक क्षेत्रात करिअरची मोठी संधी उपलब्ध असल्याचा विश्वास ॲड. गणेश पवार यांनी ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये व्यक्त केला.

यावेळी ‘सकाळ’चे निवासी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले. पानटपरी चालविणाऱ्या वडिलांना मदत करून जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर ॲड. गणेश पवार यांनी जिल्हा न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे.

न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा खंबीर व बळकट आधारस्तंभ आहे. या क्षेत्रात निश्चितपणे हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या खूप संधी आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कुटुंबात दहावीपर्यंत शिकलेला गणेश पहिलाच

वडील तानाजी पवार सोलापुरातील जाम मिलमध्ये कामाला होते, १९९४ मध्ये त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागत नसल्याने राजीनामा देऊन गुंजेगाव गाठले.

शेती करून संसाराचा गाडा पुढे हाकावा, हा त्यामागील हेतू होता. पण, शेती देखील परवडत नसल्याने त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सोलापूर गाठले. त्यावेळी ॲड. गणेश हे मोहोळमधील संजय गायकवाड (मामा) यांच्याकडे शिक्षणासाठी राहिले.

नेताजी प्रशालेत पाचवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी तेही सोलापुरात आले. त्यावेळी वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पानटपरी सुरु केली होती. गणेश हेही त्यांना मदत करायचे.

दुसरीकडे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांचा अभ्यास देखील सुरु होता. तत्पूर्वी, पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी महापालिकेच्या शाळेत घेतले होते. सहावी-सातवीचे शिक्षण संभाजी प्रशालेत, आठवी ते बारावीपर्यंत ‘जैन गुरुकूल’मध्ये शिकले. त्यानंतर दयानंद महाविद्यालयात बीएस्सी पूर्ण केली. दहावीच्या पुढे शिक्षण घेणारे गणेश कुटुंबात पहिलेच होते.

पान टपरी चालकाची दोन मुले न्यायाधीश अन् एक वकील

ॲड. गणेश यांच्या वडिलांना नेहमीच वाटायचे, मुलांनी वकिली क्षेत्रात जाऊन गोरगरिबांचे अश्रू पुसावेत. पण, गणेशने बारावीनंतर बीएस्सीला प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांची लहान बहिण सोनालीने ‘लॉ’ला प्रवेश घेतला होता. गणेशला वाटले, पदवी होईपर्यंत वडील विसरतील.

पण, वडिलांनी ‘लॉ’साठी आग्रह कायम ठेवला आणि गणेशने ‘लॉ’ला प्रवेश घेतला. दरम्यान, २०१४ मध्ये त्यांची बहीण सोनाली बर्गे-पवार दिवाणी न्यायाधीश बनली. सध्या त्या वडगाव-मावळ, पुणे येथे कार्यरत आहेत. पुढे गणेश व त्यांचा छोटा भाऊ देखील वकिलीच करतो. जिल्हा न्यायाधीशाचे स्वप्न गणेश यांनी नुकतेच पूर्ण केले.

ॲड. दातरंगे यांच्यामुळे जीवनाला कलाटणी

वकिलीची पदवी घेतल्यानंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर ॲड. गणेश पवार यांना ॲड. मिलिंद दातरंगे यांच्याकडून मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ॲड. गणेश यांच्या जीवनाला आकार आला आणि आयुष्याला कलाटणी मिळाली. २०१३ पर्यंत त्यांनी ॲड. दातरंगे यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. त्यावेळी गणेश यांची बहीण न्यायाधीश झाली.

२०१७ मध्ये ॲड. गणेश यांनाही न्यायाधीशाच्या परीक्षेत यश मिळाले, पण त्यांचे स्वप्न जिल्हा न्यायाधीशाचे असल्याने त्यांनी तो जॉब जॉईन केला नाही. ॲड. दातरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. गणेश हेही नवोदित वकिलांना मार्गदर्शन करायचे. महराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने देखील त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. त्यातून अनेकजण न्यायाधीश झाले.

‘आयुष्यभर’ अभ्यासाचे वकिली क्षेत्र

वकिली क्षेत्रात अभ्यास फार महत्त्वाचा असून त्यातूनच यशाची शिखरे पादाक्रांत करणे सहज सोपे आहे. अन्य नोकऱ्यांच्या तुलनेत वकिली क्षेत्रात भरपूर अभ्यास करावा लागतो. गुन्ह्यांचे स्वरूप, त्याचे न्यायनिवाडे, कायदे याचा नेहमीच परिपूर्ण अभ्यास असायला हवा.

समजण्याइतपत आणि बोलता येईल एवढे इंग्रजी यायला हवे. त्यामुळेच मला जिल्हा न्यायाधीश होण्याची संधी मिळाली, असेही ॲड. गणेश पवार यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT